मुंबई : मेजर क्रिकेट लीगच्या फायनल सामन्यामध्ये MI न्यूयॉर्क संघाने विजय मिळवला आहे. सिएटल ऑर्कास संघाचा ७ विकेट्सने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मुंबईने फायनलमध्ये मिळवलेल्या विजयामध्ये कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद शतकी खेळी केली. फायनलमध्ये शतक ठोकत पूरन याने विक्रम रचला आहे. सिएटल ऑर्कास संघाचा कर्णधार क्विंटन डिकॉक यानेही आधी आक्रमक खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
MI न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने अवघ्या १६ चेंडूमध्ये अर्धशतक केलं. मेजर क्रिकेट लीगच्या इतिहासामधील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. फक्त अर्धशतक करून तो थांबला नाही त्यानंतरही पूरनने षटकार-चौकारांचा पाऊस पाडला. अवघ्या ४० चेंडूमध्ये पूरनने आपलं शतक पूर्ण केलं.
निकोलस पूरन शतक झाल्यावरही मैदानात टिकून राहिल होता. निकोलसने ५५ चेंडूंमध्ये नाबाद १३७ धावा केल्या, यामध्ये त्याने १० चौकार आणि १३ षटकारांचा वर्षाव केला. मेजर क्रिकेट लीगचं हे पहिलं वर्षे होतं, पहिल्या सीझनमध्ये मुंबई संघ चॅम्पियन ठरला असून सिएटल ऑर्कासचा फायनलमध्ये पराभव झाला.
फायनल सामन्यामध्ये MI न्यूयॉर्क संघाचा कर्णधार निकोलस पूरन याने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजासाठी उतरलेल्या सिएटल ऑर्कास संघाने सर्वबाद १८३ धावा केल्या होत्या. यामध्ये क्विंटन डिकॉकने सर्वाधिक ८७ धावा केल्या. मुंबईकडून राशिद खान आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मुंबईकडून एकट्या निकोलस पूरन याने १३७ धावा केल्या, त्यासोबतच इमाद वसीम आणि वेन पार्नेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
3 SIXES TO END THE LAST OVER OF THE POWERPLAY!
THIS IS SOMETHING SPECIAL, NICKY P!???
8⃣0⃣/2⃣ (6.0) pic.twitter.com/pGRwHNz0nT
— Major League Cricket (@MLCricket) July 31, 2023
MI न्यूयॉर्क (प्लेइंग इलेव्हन): शायन जहांगीर, डेवाल्ड ब्रेविस, स्टीव्हन टेलर, निकोलस पूरन (w/c), टिम डेव्हिड, डेव्हिड विसे, रशीद खान, हम्माद आझम, नॉथुश केंजिगे, ट्रेंट बोल्ट, जसदीप सिंग
सिएटल ऑर्कास (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), नौमन अन्वर, शेहान जयसूर्या, हेनरिक क्लासेन, शुभम रांजणे, इमाद वसीम, ड्वेन प्रिटोरियस, वेन पारनेल (C), हरमीत सिंग, अँड्र्यू टाय, कॅमेरॉन गॅनन