MI vs CSK सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचं डोकं फिरलं, स्पष्टच म्हणाला “आम्ही लोकं…”

| Updated on: May 06, 2023 | 7:58 PM

आयपीएल 2023 स्पर्धेत चेन्नईने मुंबईला दुसऱ्यांदा पराभवाचं पाणी पाजलं आहे. या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न एक सामना दूर गेलं आहे. त्यानंतर रोहित शर्मा चांगलाच वैतागला आहे.

MI vs CSK सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माचं डोकं फिरलं, स्पष्टच म्हणाला आम्ही लोकं...
MI vs CSK सामन्या पराभव रोहित शर्माच्या जिव्हारी, "आम्ही फलंदाजी करताना.."
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : आयपीएल 2023 स्पर्धेतील साखळी फेरीचा शेवटचा टप्पा सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. कारण विजय आणि एक पराभव प्लेऑफचं गणित बदलू शकतं. त्यामुळे प्रत्येक संघ जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामनाही काहीसा असाच होता. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला 6 गडी आणि 14 चेंडू राखून पराभव केला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पण हा पराभव मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या जिव्हारी लागला आहे.

रोहित शर्माने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडत म्हणाला की, “आमची फलंदाजी हवी तशी झाली नाही. गोलंदाजांना बचाव करण्यासाठी पुरेशा धावा केल्या नाहीत. आमचा बॅटिंग युनिट म्हणून ऑफ-डे होता. दुर्दैवाने तिलक वर्मा नसल्याने मधल्या फळीत आम्ही कमकुवत ठरलो. आम्ही केवळ 16 धावांत तीन विकेट गमावल्या. पियुष चावला खरोखरच चांगली गोलंदाजी करत आहे. इतर गोलंदाजांनी त्याला साथ देणं गरजेचं आहे. प्रत्येकाने पुढे येऊन योगदान दिले पाहिजे.”

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

चेन्नई सुपर किंग्सने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईची सुरुवात एकदम खराब झाली. संघाच्या 13 धावा असताना कॅमरून ग्रीन बाद झाला. त्यानंतर लगेचच इशान किशन परताला. कर्णधार रोहित शर्माही शून्यावर बाद झाला. त्यामुळे संघावर पॉवरप्लेमध्ये दबाव आला. मुंबईने 20 षटकात 8 गडी गमवून 139 धावा केल्या आणि विजयासाठी 140 धावांचं आव्हान दिलं.

चेन्नईने हे आव्हान 17.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं.ऋतुराज गायकवाडने 30, डेव्हॉन कॉनव्हेनं 44, अजिंक्य रहाणेनं 21, अंबाती रायडूने 12 धावा केल्या. तर शिवम दुबे नाबाद 26 धावांवर राहीला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

मुंबईची प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमरुन ग्रीन, सूर्यकुमार यादव, नेहल वढेरा, टिम डेविड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला, आकाश मधवाल

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश थेक्षाना