IPL 2023 MI vs CSK | टीमला मोठा झटका, मुंबई-चेन्नई सामन्यातून ऑलराउंडर बाहेर

| Updated on: Apr 08, 2023 | 3:37 PM

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. स्टार ऑलराउंडरला या महामुकाबल्याआधी दुखापत झाली आहे. त्यामुळे या ऑलराउंडरला सामन्याला मुकायला लागू शकतं.

IPL 2023 MI vs CSK | टीमला मोठा झटका, मुंबई-चेन्नई सामन्यातून ऑलराउंडर बाहेर
Follow us on

मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमात आज 8 एप्रिल रोजी एकूण 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिली मॅच ही राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यात पार पडणार आहे. तर दुसरा सामना हा रंगतदार असणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांची लढत होणार आहे. दोन्ही संघ हे आयपीएलमध्ये यशस्वी ठरले आहेत. मुंबईने 5 तर चेन्नईने 4 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. यामुळे या दोन्ही संघातील सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सूक आहेत. दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. मात्र या दरम्यान टीमसाठी वाईट बातमी समोर आली आहे.

चेन्नईच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. चेन्नईचा स्टार ऑलराउंडर याला मुंबई विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागू शकतं. चेन्नईने स्टोक्सला 16 कोटी 25 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेलतलं होतं. मात्र आता स्टोक्सच्या या बातमीमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. स्टोक्स मु्ंबई विरुद्ध्या सामन्यात खेळण्यासाठी पूर्णपणे फीट नसल्याचं म्हटलं जात आहे.

इंडियन एक्सप्रेसनुसार, स्टोक्सला शुक्रवारी सरावादरम्यान टाचेत दुखापत जाणवू लागली. रिपोर्टनुसार, स्टोक्सला 10 दिवस विश्रांतीचा सल्ला देअणयात आला आह. थोडक्यात स्टोक्सला येत्या 2-3 सामन्यांना मुकावं लागू शकतं. मात्र सीएसके टीम मॅनेजमेंटकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि संदीप वॉरियर.

टीम सीएसके | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, बेन स्टोक्स, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, कायले जेमिन्सन, निशांत सिंधू, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मतीशा पाथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चाहर , प्रशांत सोलंकी, महेश थीक्ष्णा, शेख रशीद, भगत वर्मा आणि अजय मंडल.