MI vs CSK : रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कॅप्टन्सी करणार?

| Updated on: Apr 14, 2024 | 5:46 PM

IPL 2024 MI vs CSK : मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या या सामन्याला मुकणार?

MI vs CSK : रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कॅप्टन्सी करणार?
rohit and hardik mi ipl,
Follow us on

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सर्वात मोठा सामना हा आज 14 एप्रिल रोजी होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याला दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे हार्दिक बॉलिंग करत नाहीये. आयपीएलच्या या 17 व्या हंगामादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज सायमन डूल याने दावा केला आहे. त्या दाव्यामुळे असंख्य चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे. हार्दिकला पुन्हा एकदा दुखापत झाल्याचं डूलने जावा केला आहे. मात्र हार्दिकच्या दुखापतीबाबत कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

हार्दिकला दुखापत झाली असेल तर त्याला चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडावं लागू शकतं. त्यामुळे हार्दिक बाहेर पडल्यास पलटणची कॅप्टन्सी कोण सांभाळणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीत रोहित शर्मा याला पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी मिळू शकते. तसेच जसप्रीत बुमराह याला सुद्धा जबाबदारी दिली जाऊ शकते.

सायमन डूलचा दावा काय?

“हार्दिक पंड्या याने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात 3 ओव्हर बॉलिंग केली. हार्दिकने दुसऱ्या सामन्यात 4 ओव्हर टाकले. मात्र हार्दिकने तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात एकही बॉल टाकला नाही. त्यानंतर पाचव्या सामन्यातही हार्दिकने एक ओव्हरच टाकली. मी सांगतोय की हार्दिकला दुखापत झालीय. हार्दिक दुखापतीनंतरही खेळतोय. तो फिट असता तर नक्कीच बॉलिंग टाकली असती”, असा दावा सायमन डूलने केला.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.

चेन्नई सुपर किंग्स टीम : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), महेंद्रसिंह धोनी, अरावेली अवनीश, डेव्हॉन कॉनव्हे, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मोईन अली, शिवम दुबे, आरएस हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय जादव मंडल, डॅरिल मिशेल, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, दीपकुमार सिंधू, निशांत सिंधू, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पाथीराना, सिमरजीत सिंग, प्रशांत सोलंकी, शार्दुल ठाकूर, महेश तीक्षना आणि समीर रिझवी.