आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील 2 यशस्वी संघ आमनेसामने होते. चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. चेन्नईने महेंद्रसिंह धोनी याने अखेरच्या 4 चेंडूत सलग 3 सिक्ससह केलेल्या 20 धावांमुळे 206 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने या धावांचा पाठलाग करताना जोरदार लढत दिली. ओपनर रोहित शर्मा याने नाबाद शतकही ठोकलं. मात्र दुसऱ्या बाजूने साथ न मिळाल्याने मुंबईला विजय मिळवण्यात अपयश आलं. चेन्नईने मुंबईला 186 धावांवरच रोखलं. चेन्नईचा हा चौथा विजय ठरला.
चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर 20 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेल्या 207 धावांचा पाठलाग करताना मुंबईला 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 186 धावाच करता आल्या. चेन्नईने अशाप्रकारे मुंबईवर 20 धावांनी विजय मिळवला.
मुंबईने सहावी विकेट गमावली आहे. मथीशा पथीराणा याने रोमरियो शेफर्ड या घातक फलंदाजाला 1 धावेवर क्लिन बोल्ड केलं.
मुंबईला पाचवा धक्का लागला आहे. सलग 2 सिक्स ठोकल्यानंतर टीम डेव्हिड 5 बॉलमध्ये 13 धावा करुन आऊट झाला.
चेन्नईने मुंबईला तिसरा झटका दिला आहे. मथीशा पथिराणा याने तिलक वर्मा याला 31 धावांवर कॅच आऊट केलं. शार्दुल ठाकूर याने मथीशाचा कडक कॅच घेतला.
मुंबईचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 30 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने या दरम्यान 40 धावा या 9 बॉलमध्ये पूर्ण केल्या रोहितने अर्धशतकी खेळीत 7 चौकार आणि 2 सिक्स ठोकले.
मथीशा पथीराना याने मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. मथीशाने मुंबईच्या डावातील आठव्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर ईशान किशन याला शार्दूल ठाकुर याच्या हाती कॅच आऊट केलं. त्यानंतर तिसऱ्या बॉलवर मुस्तफिजुर रहमान याने बाऊंड्री लाईनवर सूर्यकुमार यादवचा अफलातून रिले कॅच घेतला. सूर्या झिरोवर आऊट झाला. सूर्याची या 17 व्या मोसमात 3 डावात झिरोवर आऊट होण्याची दुसरी वेळ ठरली.
सूर्या ठरला कमनशिबी
SURYAKUMAR YADAV DUCK..!!!!
PATHIRANA, YOU ROCKSTAR ⭐✨✨ FIZZ Magic 🪄 ✨
Wow Catch of the season it’s not a Catch it’s a Magic feel magic Mustafizur Rahman Fizz #DHONI𓃵 Rohit Fizz Pathirana 🔥🔥🔥 Feel Magic 🪄✨🪄✨ pic.twitter.com/tts00TbgEB— Pushkarkuntal (@Pushkarkuntal1) April 14, 2024
रोहित शर्मा-ईशान किशन या सलामी जोडीने 207 धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी भागीदारी केली आहे. मुंबईच्या 5 ओव्हरनंतर 53 धावा झाल्या आहेत.
मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 207 धावांचा पाठलाग करताना 4 ओव्हरमध्ये 38 धावांची भागीदारी केली आहे. रोहित 21 आणि ईशान 17 धावांवर नाबाद खेळत आहे.
मुंबईच्या बॅटिंगला सुुरवात झाली आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे.
चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं आहे. महेंद्रसिंह धोनी याने 20 व्या ओव्हरमध्ये शेवटच्या 4 बॉलमध्ये सलग 3 सिक्ससह एकूण20 धावा केल्या. यामुळे चेन्नईला 200 पार मजल मारता आली. आता मुंबई हे आव्हान पूर्ण करणार का याकडे पलटणचं लक्ष असणार आहे.
कॅप्टन हार्दिक पंड्या याने शिवम दुबे आणि ऋतुराज गायकवाड ही जोडी फोडून चेन्नईला तिसरा झटका दिला आहे. हार्दिकने चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याला मोहम्मद नबी याच्या हाती 69 धावांवर कॅच आऊट केलं. शिवम आणि ऋतुराज या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदीरी केली.
चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 33 बॉलमध्ये सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं आहे. ऋतुराजच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 16 वं अर्धशतक ठरलं आहे.
रोहित शर्मा ऋतुराज गायकवाड याचा 39 धावांवर असताना कॅच घेण्यात अपयशी ठरला. रोहितने ऋतुराजच्या कॅचसाठी डाईव्ह मारुन प्रयत्न केला. रोहित दुर्देवाने कॅच घेऊ शकला नाही. या दरम्यान रोहितची पँट डाईव्ह मारताना साधारण सरकली. त्यामुळे काही क्षण मैदानात हशा पिकला.
लोकल बॉय शिवम दुबे याने मुंबई इंडियन्स विरुद्ध 13 बॉलमध्ये 3 चौकारांसह 20 धावा केल्या आहेत. शिवमने या दरम्यान आपला धमाका दाखवून दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा शिवम दुबला लवकरात लवकर आऊट करण्याचा प्रयत्न असणार आहे.
श्रेयस गोपाळ याने चेन्नईला दुसरा ध्कका देत विकेटचं खातं उघडलं आहे. श्रेयसने विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती रचीन रवींद्र याला कॅच आऊट केलं. अंपायरच्या निर्णयाला आव्हान देत ईशानने कॅप्टन हार्दिक पंड्या याला रीव्हीव्हूय घेण्याची विनंती केली. त्यानंतर रवींद्र डीआरएसमध्ये आऊट असल्याचं स्पष्ट झालं.
चेन्नईने पावर प्लेमधील 6 ओव्हरमध्ये 1 विकेट्स गमावून 48 धावा केल्या आहेत. रचीन रवींद्र 12 आणि ऋतुराज गायकवाड 29 धावांवर नाबाद आहेत. तर अजिंक्य रहाणे 5 धावा करुन माघारी परतला.
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पहिली विकेट घेण्यात यशस्वी ठरली आहे. गेराल्ड कोएत्झी याने लोकल बॉय आणि अनुभवी अजिंक्य रहाणे याला कॅप्टन हार्दिक पंड्या याच्या हाती 5 धावांवर कॅच आऊट केलं.
वानखेडे स्टेडियममध्ये सामना असल्याने चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यासाठी लोकल बॉय अजिंक्य रहाणे हा ओपनिंगला आला आहे. रहाणेसोबत रचीन रवींद्र आहे. मुंबईकडून मोहम्मद नबी पहिली ओव्हर टाकत आहे.
रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.
मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आतापर्यंत वानखेडेत 11 सामने झाले आहेत. मुंबईने 11 पैकी 7 सामने घरच्या मैदानात जिंकले आहेत. तर चेन्नईने 4 सामन्यात विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स दोन्ही संघात आतापर्यंत एकूण 36 वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबईचा या 36 पैकी सर्वाधिक सामन्यात दबदबा राहिला आहे. मुंबईने 36 पैकी 20 सामने जिंकले आहेत. तर चेन्नईने 16 सामने जिंकले आहेत.
मुंबई विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याला वानखेडे स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत. वानखेडे स्टेडियममध्ये एक एक करुन चाहते स्थानपन्न होत आहेत. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी या दोघांकडे क्रिकेट चाहत्यांच लक्ष असणार आहे.