MI vs CSK : ऋतुराजचं सिक्ससह रेकॉर्डब्रेक अर्धशतक, केएल-सचिनला पछाडलं, ठरला पहिला भारतीय

| Updated on: Apr 14, 2024 | 9:05 PM

Ruturaj Gaikwad MI vs CSK IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियमध्ये इतिहास रचला आहे. ऋतुराजने इतिहास रचला आहे.

MI vs CSK : ऋतुराजचं सिक्ससह रेकॉर्डब्रेक अर्धशतक, केएल-सचिनला पछाडलं, ठरला पहिला भारतीय
Ruturaj Gaikwad MI vs CSK IPL 2024
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 29 व्या सामन्यात खणखणीत अर्धशतक ठोकलं आहे. ऋतुराजने सिक्स ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजने या अर्धशतकासह एक मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ऋतुराजने सचिन तेंडुलकर याच्यासह अनेक फलंदाजांना मागे टाकलं आहे. ऋतुराजने नक्की काय रेकॉर्ड केलाय? हे जाणून घेऊयात.

ऋतुराजने चेन्नईच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर गेराल्ड कोएत्झी याच्या बॉलिंगवर सिक्स ठोकला. ऋतुराजने या सिक्ससह अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजने 33 बॉलमध्ये 3 फोर आणि 4 सिक्ससह 142.11 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजच्या आयपीएल कारकीर्दीतील हे 16 वं अर्धशतक ठरलं. ऋतुराजने सिक्ससह आयपीएलमधील 2 हजार धावांचा टप्पा पार केला. ऋतुराज आयपीएलमध्ये वेगवान 2 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला. ऋतुराजने या बाबतीत केएल राहुल, सचिन तेंडुलकर आणि ऋषभ पंत या तिघांना मागे टाकलं.

ऋतुराजची रेकॉर्ड ब्रेक खेळी

ऋतुराजने 57 डावांमध्ये 2 हजार धावा पूर्ण केल्या. तर केएल राहुल याने 60, सचिन तेंडुलकर याने 63 आणि ऋषभ पंतने 64 डावांमध्ये 2 हजार धावांचा टप्पा पार केला होता.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.