MI vs DC : रोहित शर्माचा वानखेडेत शानदार रेकॉर्ड, विराटच्या क्लबमध्ये धडक

| Updated on: Apr 07, 2024 | 8:24 PM

Rohit Sharma MI vs DC : रोहित शर्माने मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स सामन्यादरम्यान ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

MI vs DC : रोहित शर्माचा वानखेडेत शानदार रेकॉर्ड, विराटच्या क्लबमध्ये धडक
rohit sharma mi
Image Credit source: BCCI/IPL
Follow us on

मुंबई इंडियन्सचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात झिरोवर आऊट झाला होता. मात्र रोहितने जोरदार कमबॅक करत दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध झंझावाती खेळी केली. रोहितने आपल्या होम ग्राउंडमध्ये दिल्ली विरुद्धच्या 17 व्या मोसमातील 20 व्या सामन्यात कीर्तीमान केला आहे. दिल्लीने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं.

दिल्लीचा कॅप्टन ऋषभ पंत याने फिल्डिंगचा निर्णय करत मुंबईला बॅटिंगसाठी बोलावलं. मुंबईकडून रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली. मुंबईला या सलामी जोडीने अफलातून सुरुवात करुन दिली. रोहित-ईशान या दोघांनी 80 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल याने ही सेट जोडी फोडली. अक्षरने सामन्यातील 7 व्या ओव्हरमध्ये रोहितला क्लिन बोल्ड केलं.

रोहित शर्मा याने 27 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्ससह 181.48 च्या स्ट्राईक रेटने 49 धावांची खेळी केली. रोहित दुर्देवी ठरला. त्याचं अर्धशतक हे अवघ्या 1 धावेने हुकलं. मात्र रोहितने यानंतरही एक मोठा कीर्तीमान केला आहे. रोहितने विराट कोहली आणि डेव्हीड वॉर्नर यासारख्या दिग्गज फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. रोहितने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने दिल्ली व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही 1 हजार धावा केल्या आहेत. तसेच रोहित सर्वाधिक संघांविरुद्ध 1 हजार धावा करणारा संयुक्तरित्या पहिल्या फलंदाजही ठरला आहे.

रोहित शर्माचा कीर्तीमान


रोहितआधी डेव्हीड वॉर्नर याने पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 1 हजार धावा केल्या आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विराट कोहली याने दिल्ली कॅपिट्ल्स आणि चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 1 हजार धावा केल्या आहेत.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.