वेस्ट इंडिजचा ऑलराउंडर रोमरिया शेफर्ड याने आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध धमाका केला आहे. रोमरियो याने वानखेडे स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्सच्या डावातील 20 व्या ओव्हरमध्ये विस्फोटक खेळी करत 32 धावा ठोकल्या. रोमरियोने या ओव्हरमध्ये 4 सिक्स आणि 2 फोर खेचले. विशेष म्हणजे रोमरियोने सलग 3 सिक्स खेचले. रोमरियोच्या या शेवटच्या ओव्हरचा व्हीडिओ आयपीएलने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
दिल्ली कॅपिट्ल्सकडून एनरिच नॉर्तजे याने 20 वी ओव्हर टाकली. रोमरियो याने नॉर्तजेच्या बॉलिंगची पिसं काढली. रोमरियोने अनुक्रमे या ओव्हरमधील पहिल्या आणि पाचव्या बॉलवर चौकार ठोकले. तर उर्वरित 4 बॉलमध्ये रोमरियोने 4 सिक्स ठोकले. रोमरियोने केल्या 32 धावांमुळे मुंबईला दिल्लीसमोर 235 धावांचं आव्हान ठेवता आलं. रोमरियोने 10 चेंडूमध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 390 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 39 धावांची खेळी केली.
दरम्यान मुंबई जोरदार सुरुवातीनंतर बॅकफुटवर गेली होती. मात्र कॅप्टन हार्दिक पंड्या, रोमरियो शेफर्ड आणि टीम डेव्हिड या तिघांनी गिअर बदलला. मुंबईने अखेरच्या 5 ओव्हरमध्ये विक्रमी 94 धावा केल्या. मुंबईने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 75 धावा केल्या. त्यानंतर 7 ते 10 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 30 धावा केल्या. 11 ते 15 या ओव्हरदरम्यान 3 विकेट्स गमावून 33 धावा जोडल्या.
𝐓 𝐎 𝐃 – 𝐏 𝐇 𝐎 𝐃 🔥#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvDC #ESADay #EducationAndSportsForAllpic.twitter.com/IaVPjFsUoa
— Mumbai Indians (@mipaltan) April 7, 2024
मुंबईला रोहित शर्मा आणि ईशान किशन या सलामी जोडीने 80 धावांची भागीदारी करुन दिली. मात्र त्यानंतर रोहित, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि ईशान किशन झटपट आऊट झाले. त्यानंतर हार्दिक आणि टीम डेव्हिड या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. तर डेव्हीड आणि रोमरियो या दोघांनी अखेरच्या 13 बॉलमध्ये 53 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी आणि जसप्रीत बुमराह.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, झाये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, इशांत शर्मा आणि खलील अहमद.