मुंबई | आयपीएल 16 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स भिडणार आहेत. शुक्रवारी 12 मे ला हे दोन्ही संघ मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आमनेसामने असणार आहे. या दोन्ही संघांचा या सिजनमध्ये एकमेकांविरुद्ध खेळण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी 25 एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये गुजरातने मुंबईवर पहिल्यांदा विजय मिळवला होता. दरम्यान या सामन्यात मुंबई आपल्या पराभवाचा वचपा घेणार का, याकडे पलटण चाहत्यांचं लक्ष आहे. हार्दिक पंड्या गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा याच्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा असणार आहे.
गुजरातने 2022 या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. गुजरातने पहिल्याच हंगामात अनुभवी संघांना पाणी पाजत बाजी मारली. मुंबई आणि गुजरात यांच्यात आतापर्यंत एकूण 2 वेळा आमनसामना झाला आहे. यामध्ये मुंबईने आणि गुजरातने प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. त्यामुळे ही आकड्याची लढाई बरोबरीत आहे. मुंबईची गोलंदाजी हा पलटणचा कमीपणाची बाजू आहे. तर गुजरातचे गोलंदाज आणि फलंदाज सातत्याने चमदार कामगिरी करतायेत. त्यामुळे कागदावर बरोबरीत असलेल्या दोन्ही टीमपैकी शुक्रवारी कोण मैदान मारेल, हे काही तासांमध्ये स्पष्ट होईल.
मुंबई इंडियन्स टीम | रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, ख्रिस जॉर्डन आणि संदीप वॉरियर.
गुजरात टायटन्स टीम | हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुबमन गिल, विजय शंकर, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहम्मद शमी, नूर अहमद, मोहित शर्मा, जयंत यादव, जोशुआ लिटल, शिवम मावी, रविश्रीनिवासन साई किशोर, श्रीकर भारत, साई सुधारसन, अल्झारी जोसेफ, प्रदीप सांगवान, मॅथ्यू वेड, दासून शनाका, ओडियन स्मिथ, दर्शन नळकांडे, उर्विल पटेल आणि यश दयाल.