IPL 2024 : मुंबईत दोन गट! पहिल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चा

| Updated on: Mar 25, 2024 | 5:19 PM

Hardik Pandya vs Rohit Sharma : मुंबई इंडियन्सचे चाहते 17 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यानंतर आमनेसामने आले आहेत. हार्दिकने रोहितला दिलेल्या वागणुकीवरुन मुंबईत 2 गट पडले असल्याचं सोशल मीडियावर दिसत आहे.

IPL 2024 : मुंबईत दोन गट! पहिल्या सामन्यानंतर सोशल मीडियावर चर्चा
Follow us on

रोहित शर्मा 13 वर्षांनंतर पहिल्यांदाच 24 मार्च रोजी 17 व्या हंगामात गुजरात टायटन्स विरुद्ध एक खेळाडू म्हणून खेळला. मुंबई इंडियन्सला हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात हंगामातील सुरुवात पराभवाने करावी लागली. मुंबईला 169 धावांचा पाठलाग करताना 162 धावा करता आल्या. गुजरातने हा सामना अशाप्रकारे 6 धावांनी जिंकत विजयी श्रीगणेशा केला. या सामन्यात असे प्रसंग घडले, ज्यावरुन रोहित शर्मा याला जाणीवपूर्वक एकटं पाडलं जात असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर मुंबईत 2 गट पडल्याचंही म्हटलं जात आहे.

कॅप्टन हार्दिक पंड्या याने सामन्यात फिल्डिंग दरम्यान रोहित शर्माचा मान न राखता त्याला अपमानास्पद वागणूक दिली, असा दावा नेटकऱ्यांचा आहे. तसेच हार्दिकने रोहितच्या सल्ल्याकडेही दुर्लक्ष केलं. तसेच ल्यूक वूड यानेही रोहित शर्मा याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा व्हीडिओ व्हायरल झालाय. अशात या सर्व प्रकारामुळे हार्दिककडून जाणीवपूर्वक रोहितला एकटा पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत का? अशी चर्चा रंगली आहे.

डमॅज कंट्रोलचा प्रयत्न?

सामन्यानंतर हार्दिकने रोहितला दिलेल्या वागणूकीबाबत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकने सामन्यानंतर रोहितला मागून मीठी मारली. मात्र रोहितने हार्दिकला तिथल्या तिथेच हटकलं आणि त्याची शाळा घेतली.

रोहित पर्वानंतर पलटणमध्ये 2 गट?

रोहितला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर मुंबई इंडियन्समध्ये 2 गट पडल्याचे म्हटलं जात आहे. एक गट हा हार्दिकला कर्णधार केल्याचं समर्थन करणारा आहे. तर दुसरा गट हा रोहितच्या पाठीशी असणाऱ्यांचा आहे. मात्र यात रोहितकडून कुठलीही गटबाजी नाही, रोहितचं कर्णधारपद काढून घेतल्याचा राग हा चाहत्यांचा आहे.

ल्यूक वूडकडून रोहितकडे दुर्लक्ष

हार्दिकक निघून गेला

मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.

गुजरात टायटन्स प्लेईंग इलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, अजमतुल्ला ओमरझाई, राहुल तेवतिया, रशीद खान, उमेश यादव, आर साई किशोर आणि स्पेन्सर जॉन्सन.