मुंबई | मुंबई इंडियन्स टीमला आयपीएलच्या 16 व्या मोसमताील 31 व्या सामन्यात पंजाब किंग्स कडून पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली. पंजाबने विजयासाठी दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला 201 धावाच करता आल्या. मुंबईने या धावांचा पाठलाग छान पद्धतीने केला, मात्र थोडक्यासाठी प्रयत्न अपुरे राहिले. अर्शदीप सिंह हा पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अर्शदीपने या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे अर्शदीपने लास्ट ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत रंगतदार झालेला सामना पंजाबच्या बाजूने झुकवला.
अर्शदीपने 20 व्या ओव्हरमध्ये मुंबईच्या फलंदाजांना सलग 2 बॉलवर आऊट केलं. अर्शदीपने आपल्या स्पीडच्या जोरावर मुंबईच्या दोन्ही फलंदाजांचा काटा काढला. विशेष बाब म्हणजे अर्शदीपने हे दोन्ही बॉल इतक्या वेगाने टाकले दोन्ही वेळा मिडल स्ंटपचे 2 तुकडे झाले.
अर्शदीपने मुंबई इंडियन्सच्या डावातील 20 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर पहिले टिळक वर्मा याचा मिडल स्टंप उडवला. टिळकने 3 धावा केल्या. त्यानंतर पुढील बॉलवर नेहल वढेरा याला त्याच पद्धतीने क्लिन बोल्ड करत अर्शदीपने पुन्हा मिडल स्टंपचे 2 तुकडे केले. अर्शदीपने या ओव्हमध्ये अवघ्या 2 धावांच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या.
अर्शदीपने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये मुंबईच्या बॅटिंग ऑर्डर सत्यानाश केला. यामुळे पलटणच्या चाहत्यांचा घरच्या मैदानात हिरमोड झाला. अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 29 धावांच्या मोबदल्यात मुंबईच्या 4 गोलंदाजांना आऊट केलं. यामध्ये इशान किशन, सूर्यकुमार यादव या दोघांना निर्णायक क्षणी आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
स्टंप ब्रेकर अर्शदीप सिंह
Stump breaker,
Game changer!Remember to switch to Stump Cam when Arshdeep Akram bowls ?#MIvPBKS #IPLonJioCinema #IPL2023 #TATAIPL | @arshdeepsinghh pic.twitter.com/ZnpuNzeF7x
— JioCinema (@JioCinema) April 22, 2023
मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याआधी पर्पल कॅप आरसीबीच्या मोहम्मद सिराज याच्याकडे होती. मात्र अर्शदीप सिंह याने 4 विकेट्स घेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला मागे टाकत पर्पल कॅप मिळवली.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, टिळक वर्मा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, जोफ्रा आर्चर, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.
पंजाब किंग्स प्लेइंग इलेव्हन | सॅम कुरन (कर्णधार), अथर्व तायडे, प्रभसिमरन सिंग, मॅथ्यू शॉर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (डब्ल्यू), हरप्रीत सिंग भाटिया, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चहर आणि अर्शदीप सिंग.