मुंबई : मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना सुरू आहे. मुंबई इंडिअन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने टॉस जिंकला आहे. टॉस जिंकल्यावर त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबी संघाची सुरूवात एकदम खराब झालेली पाहायला मिळाली. विराट कोहली पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. विराट आऊट झाल्यावर लखनऊ सुपर जायंट्स संघाचा खेळाडू नवीन उल हक याने एक पोस्ट केली आहे.
नवीनने केलली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. गौतम गंभीर, नवीन उल हक आणि विराट कोहली यांची भांडणं जवळपास सर्व क्रिकेट विश्वाने पाहिली आहेत. हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर कोहलीने लखनऊच्या सामन्यावेळी वृद्धिमान साहाचं कौतक करतानाची पोस्ट केली. त्यानंतर आज कोहली बाद झाल्यावर नवीनने पोस्ट केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
त्या दिवशी झालेली भांडणं मिटलीत असं सर्वांना वाटलं खरं पण तसं काही झालेलं दिसत नाही. उलट आता हे प्रकरण आणखी चिघळणार असं दिसत आहे.
मुंबईच्या जेसन बेहरेनडॉर्फने आपल्या दोन्ही ओव्हरमध्ये आरसीबीच्यादोन फलंदाजांना आऊट केलं. विराट कोहली मोठा फटका खेळण्याचा नादाच आऊट झाला. त्यानंतर आलेल्या अनुज रावत यानेही फार काही चमक दाखवली नाही. दोघांना आऊट केल्यावर ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी डाव सावरला.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड