मुंबई : IPL 2023 च्या 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीवर विजय मिळवला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात 200 धावांचं लक्ष्य 16 व्या ओव्हरमधील तिसऱ्याच बॉलवर पूर्ण केलं. या सामन्यात ‘SKY’ म्हणजेच सूर्यकुमार यादव याने वादळी आणि कलात्मक खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. सूर्यासोबत युवा खेळाडू नेहर वढेरा याला वरच्या क्रमांकावर बॅटींग करण्याची संधी मिळाली होती. सूर्याच्या साथीने त्यानेही अर्धशतक करत सिक्सर मारत विजयावर शिक्कमोर्तब केलं. सामन्यानंतर त्याने सूर्याने त्याला मैदानात असताना काय सांगितलं होतं? याबाबत सांगितलं आहे.
जेव्हा आम्ही दोघे मैदानात होतो त्यावेळी आमच्या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. सूर्या मला खेळत राहा असं म्हणत माझा आत्मविश्वास वाढवत होता. दोघांनी 15 किंवा 16 ओव्हरपर्यंत बॅटींग केली तर सामना संपवू शकतो आणि आम्ही तेच केलं. सूर्याल मॅच लवकर संपवायची होती, सूर्याला पाहूनच मी स्कूप शॉट शिकल्याचं नेहर वढेराने सांगितलं.
In Match 5️⃣4️⃣ of #TATAIPL between #MI & #RCB
Here are the RuPay On-The-Go 4s, TIAGO.ev Electric Striker & Dream11 GameChanger of the match award winners. #MIvRCB@RuPay_npci | #RuPayCreditonUPI | #BeOnTheGo@Tatamotorsev | #Tiagoev | #Goev@Dream11 | #SabKhelenge pic.twitter.com/oJmf7R9iQW
— IndianPremierLeague (@IPL) May 9, 2023
टॉप ऑर्डरमध्ये बॅटींग करताना मजा येते. याआधी मी तळाला फलंदाजासाठी येत होतो, मला वरच्या स्थानावर खेळण्याची संधी मिळाली आणि मी सलग अर्धशतके केलीत. माझ्या खेळीने संघ जिंकला याचा मला अधिक आनंद असून आशा आहे आम्ही असंच प्रदर्शन पुढे करत राहू, असंही नेहल वढेरा म्हणाला.
इशान किशनने 21 चेंडूत 42 धावा ठोकल्या, कर्णधार रोहित शर्मा केवळ 7 धावा करून बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहल वढेरा यांनी मिळून तुफान खेळी केली. सूर्याने 35 चेंडूत 7 चौकार-6 षटकार मारले आणि 237 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 83 धावा केल्या, तर नेहल वढेराने 34 चेंडूत 52 धावा ठोकल्या.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन) : रोहित शर्मा (C), इशान किशन (W), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, जेसन बेहरेनडॉर्फ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन) : विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (W), वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, विजयकुमार विशक, मोहम्मद सिराज, जोश हेजलवुड