MI vs RR Head To Head : मुंबई-राजस्थान यांच्यात कुणाचे आकडे भारी? दोघांपैकी कोण सरस?

| Updated on: Mar 31, 2024 | 7:45 PM

Mumbai Indians vs Rajasthan Royals Head To Head Records : मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्स विरुद्ध आकडेवारी कशी आहे? दोघांपैकी वरचढ कोण? पाहा आकडेवारी

MI vs RR Head To Head : मुंबई-राजस्थान यांच्यात कुणाचे आकडे भारी? दोघांपैकी कोण सरस?
Follow us on

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या 17 व्या मोसमातील आपला तिसरा आणि घरच्या मैदानातील पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. मुंबईसमोर राजस्थान रॉयल्सचं आव्हान असणार आहे. मुंबईला यंदाच्या मोसमात खेळलेल्या दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. अशात मुंबईवर राजस्थान रोखण्यासह पहिला विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. मुंबई-राजस्थान सामन्यानिमित्ताने दोन्ही संघात वरचढ कोण आहे? हे आपण जाणून घेऊयात.

आकडेवारी काय सांगते?

राजस्थान रॉयल्सच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते 16 व्या मोसमापर्यंत मुंबई विरुद्ध राजस्थान यांच्यात एकूण 28 सामने खेळवण्यात आले आहेत. मुंबईचा यामध्ये दबदबा राहिला आहे. मुंबईने राजस्थानवर 15 सामन्यात मात केली आहे. तर राजस्थानला 12 सामने जिंकण्यात यश आलं आहे. तर एका सामान्याचा निकाल लागू शकला नाही. त्यामुळे आकडेवारीवरुन मुंबईच राजस्थानवर वरचढ आहे.

दरम्यान मुंबईला राजस्थान विरुद्ध विजय मिळवून हॅटट्रिक करण्याची संधी आहे. मुंबईने गेल्या 2 हंगामात राजस्थानवर मात केली आहे. मुंबईने 2023 मध्ये राजस्थानला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. तर 2022 साली 5 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता पलटणला पहिल्या विजयासह राजस्थान विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण करण्याची सुवर्ण संधी आहे.

राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोवमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, आर अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.

मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.