मुंबई | मुंबई इंडियन्स टीमने आयपीएल 16 व्या मोसमातील 69 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवला. मुंबईसाठी प्लेऑफच्या दिशेने पुढे जाण्यासाठी हा विजय महत्वाचा होता. या महत्वाच्या आणि अटीतटीच्या सामन्यात मुंबईला विजय महत्वाचा होता. मुंबईन विजय मिळवला आणि पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी झेप घेतली. मुंबईच्या या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं टेन्शन दुप्पटीने वाढलं आहे.
हैदराबादने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 201 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 18 ओव्हर्समध्ये 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. कॅमरुन ग्रीन आणि रोहित शर्मा हे दोघे मुंबईच्या विजयाचे हिरो ठरले. कॅमरुनने 18 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार ठोकत मुंबईला विजयी केलं. तसेच ग्रीनने आपलं शतकही पूर्ण केलं. कॅमरुन या मोसमात शतक ठोकणारा मुंबईचा दुसरा आणि एकूण नववा फलंदाज ठरला. तसेच ग्रीन या पर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज ठरला.
ग्रीनने 47 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 8 फोरसह नाबाद 100 धावा केल्या. रोहित शर्मा याने 56 रन्सची अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशन याने 14 आणि सूर्यकुमार यादव याने नाबाद 25 धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार आणि मयंक डागर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
दरम्यान मुंबईच्या विजयामुळे आरसीबीचं टेन्शन दुप्पटीने वाढलं आहे. आता आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत गुजरात टायटन्स विरुद्ध जिंकावं लागणार आहे. त्यात दुसऱ्या बाजूला पावसाने आरसीहीची चिंता वाढवली आहे. आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलंय. या भागात गेल्या काही तासांआधी पाऊस झालाय.
पावसामुळे 7 वाजता होणारा टॉस होऊ शकलेला नाही. सामन्याला 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणं अपेक्षित असतं. मात्र त्यानंतर 7 वाजून 45 मिनिटांनी टॉस झाला. त्याचं कारण म्हणजे पाऊस. आता खेळपट्टीवरुन कव्हर काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे सामन्याला सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. मात्र सामन्यादरम्यान पुन्हा पाऊस आला, तर आरसीबीसाठी धोका होऊ शकतो. त्यामुळे या सामन्यात पाऊस होऊ नये, अशी पार्थना आरसीबीचे चाहते करत आहेत.
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि आकाश मधवाल.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, विव्रत शर्मा, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, नितीश रेड्डी, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, मयंक डागर, भुवनेश्वर कुमार आणि उमरान मलिक.