आयपीएलच्या 17 मोसमातील 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद आमनेसामने होते. या दोन्ही संघांची ही या हंगामात आमनेसामने येण्याची दुसरी वेळ होती. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वात मुंबईने हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवत पराभवाचा वचपा घेतला. हैदराबादने मुंबईसमोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मुंबईने हे आव्हान सूर्यकुमार यादव याच्या शतकाच्या जोरावर 3 विकेट्स गमावून 17.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईचा हा या हंगामातील चौथा विजय ठरला. तसेच मुंबईने केलेल्या पराभवामुळे हैदराबादच्या प्लेऑफच्या हिशोबाने अडचणी वाढल्या आहेत.
मुंबईने हैदराबादवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. हैदराबादने विजयासाठी दिलेलं 174 धावांचं आव्हान 17.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. सूर्याने विनिंग सिक्स ठोकत शतकही पूर्ण केलं. मुबंईचा हा या 17 व्या मोसमातील चौथा विजय ठरला.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. नमन धीर झिरोवर बाद झाल्यानंतर मुंबईची 3 बाद 31 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी शतकी भागीदारी केली.
सूर्यकुमार यादवने हैदराबाद विरुद्ध 30 बॉलमध्ये मुंबई अडचणीत असताना अर्धशतक ठोकलंय.
सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा या जोडीने चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. नमन धीरच्या रुपात मुंबईने तिसरी विकेट 31 धावांवर गमावली होती. त्यानंतर सूर्या आणि तिलक या दोघांनी पलटणडा डाव सावरत अर्धशतकी भागीदारी केलीय.
मुंबईने तिसरी विकेट गमावली आहे. नमन धीर झिरोवर कॅच आऊट झाला. भुवनेश्वर कुमार याने धीरला आऊट केलं.
मुंबईला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा कॅच आऊट झाला आहे. रोहितच्या रुपात पलटणने दुसरी विकेट गमावलीय. रोहित 4 धावा करुन माघारी परतला.
हैदराबादने मुंबईला पहिला झटका दिला आहे. ईशान किशन आऊट झाला आहे. मार्को जान्सेन याने ईशान किशन याला 9 धावांवर विकेटकीपर मयंक अग्रवाल याच्या हाती कॅच आऊट केलं. मुंबईचा स्कोअर 1.4 ओव्हरमध्ये 1 बाद 26 असा झाला आहे.
मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. रोहित शर्मा आणि ईशान किशन ही सलामी जोडी मैदानात आली आहे. हैदराबादने मुंबईला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं आहे.
हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. पीयूष चावला याने अब्दुल समद याला एलबीडब्ल्यू आऊट केलं आहे.
मुंबईने हैदराबादला सातवा झटका दिला आहे. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने मार्को यान्सेन याला 17 धावांवर आऊट केलं.
मुंबई इंडियन्सने हैदराबादला सहावा झटका दिलाय. शाहबाज अहमद याला हार्दिक पंड्याने सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलंय.
हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. पीयूष चावला याने हेन्रिक क्लासेन याला 2 धावांवर क्लिन बोल्ड केल आहे.
मुंबईने हैदराबादला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. ट्रेव्हिस हेड 48 आणि नितीश रेड्डी 20 धावा करुन माघारी परतली. त्यामुळे हैदराबादची स्थिती 4 बाद 92 अशी स्थिती झाली.
अंशुल कंबोज याने आपली पहिलीवहिली विकेट घेत हैदराबादला दुसरा धक्का दिला आहे. अंशुलने मयंक यादव याला 5 धावांवर क्लिन बोल्ड केलं.
मुंबई इंडियन्सने ट्रेव्हिस हेडला जीवनदान दिलं आहे. हेडला सामन्यातील आठव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर जीवनदान मिळालं. नवीन तुषारा याने 45 धावांवर कॅच सोडला.
जसप्रीत बुमराह याने हैदराबादला पहिला झटका दिला आहे. बुमराहने अभिषेक शर्मा याला विकेटकीपर ईशान किशन याच्या हाती 11 धावांवर कॅच आऊट केलं. शर्माने ट्रेव्हिस हेडसह 56 धावांची सलामी भागीदारी केली.
हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध जोरदार सुरुवात केली आहे. हैदराबादने पहिल्या 5 ओव्हरमध्ये बिनबाद 51 धावा केल्या आहेत. ट्रेव्हिस हेड 33 आणि अभिषेक शर्मा 11 धावांवर नाबाद आहे. पाचव्या ओव्हरमध्ये डेब्यूटंट अंशुल कंबोज याने ट्रेव्हिस हेड याला क्लिन बोल्ड केला होता. मात्र तो नो बॉल असल्याने हेड वाचला आणि त्याला जीवनदान मिळालं. अंशुलची ही चूक किती महागात पडणार, हे लवकरच स्पष्ट होईल.
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. मुंबईने हैदराबादला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलंय. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, अंशुल कंबोज, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह आणि नुवान तुषारा.
हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईने टॉस जिंकलाय. मुंबईचा कॅप्टन हार्दिक पंड्या याने फिल्डिंगचा करण्याचा निर्णय घेत हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
मुंबई विरुद्ध हैदराबाद दोन्ही संघ आयपीएलच्या 17 व्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने आहेत. याआधी 27 मार्च रोजी उभयसंघात सामना झाला होता. तेव्हा हैदराबादला मुंबई विरुद्ध 277 धावा करुनही अवघ्या 31 धावांनी विजय मिळवता आला होता. त्यामुळे आता पलटण आपल्या घरच्या मैदानात वानखेडे स्टेडियममध्ये हैदराबादचा धुव्वा उडवून पराभवाचा वचपा घेण्यासाठी तयार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.