मुंबई : ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. असं असताना ही मालिका डेविड वॉर्नरच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट आहे. डेविड वॉर्नर यानंतर कसोटीतून निवृत्ती घेणार आहे. दुसरीकडे, मिचेल जॉनसन याच्या वक्तव्याने नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. माजी गोलंदाज मिचेल जॉनसेन याने डेविड वॉर्नरच्या निवृत्ती कसोटीवर टीका केली आहे. ज्या क्रिकेटपटूच्या बॉल टॅम्परिंगमुळे संपूर्ण संघाचं नाव खराब झालं. त्या क्रिकेटपटूला कसोटीत निवृत्ती देताना इतकं सर्व आयोजन करणं चुकीचं आहे. मिचेल जॉनसनच्या टीकेनंतर आजी माजी खेळाडूंनी मिचेलवर टीकास्त्र सोडलं आहे. उस्मान ख्वाजाने मिचेल जॉनसनला खडे बोल सुनावले आहेत. आता पुन्हा एकदा मिचेल जॉनसनने या वादाचं आणखी एक कारण सांगून टाकलं आहे. त्यामुळे हा वाद लवकर शमेल असं दिसत नाही.
मिचेल जॉनसन याने द क्रिकेट शोच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “वॉर्नरने मला एक मेसेज केला होता. हा मेसेज खूपच वैयक्तिक होता. त्यानंतर मी त्याला फोनही केला होता. मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न मी कायम करत असतो. जर तु्म्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास असेल तर एकत्रितपणे चर्चा करून दूर करू शकता. या वेळेपर्यंत मी कधीही पर्सनल बोललो नव्हतो. त्यामुळेच मला कॉलम लिहिण्यास प्रवृत्त केलं गेलं. हा त्याचा एक भाग आहे. हे नक्कीच एक कारण होतं.”, असं मिचेल जॉनसन याने सांगितलं.
“मेसेजमध्ये काय होतं मी मी नाही सांगणार. पण डेविड याबाबत बोलू इच्छित असेल तर ते त्याच्यावर अवलंबून आहे. त्यात काही अशा बाबी होत्या त्या निराशाजनक होत्या. त्याने जे काय लिहिलं होतं ते खूपच वाईट होतं हे मी प्रामाणिकपणे सांगतो.”, असं मिचेल जॉनसन याने सांगितलं. पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी मालिकेत डेविड वॉर्नरला स्थान मिळाल्याने मिचेल जॉनसनने निवड समितीवर टीका केली आहे. इतकंच काय तर डेविड वॉर्नरचा मागच्या 36 डावातील सरासरी 26 आहे.