India vs Australia : अर्धी टीम आऊट करणाऱ्या मिचेल स्टार्क याला अक्षरने मारले सलग दोन कडक सिक्स

| Updated on: Mar 19, 2023 | 4:52 PM

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सुरू असलेल्या दुसऱ्या वनडेमध्ये अक्षर पटेलने मारलेल्या दोन सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. नेटकरही त्याचं कौतुक करत आहेत.

India vs Australia : अर्धी टीम आऊट करणाऱ्या मिचेल स्टार्क याला अक्षरने मारले सलग दोन कडक सिक्स
Follow us on

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये भारताचा डाव अवघ्या 117 धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने टॉप ऑर्डर उद्ध्वस्त करून टाकली. एकट्या स्टार्क याने 5 विकेट्स घेत अर्धा संघ बाद केला. प्रमुख फलंदाजांनी स्टार्कसमोर अक्षरक्ष: लोटांगण घातलं. मात्र विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी स्टार्कचा सामना करत धावा वसुल केल्या. अक्षर पटेल याने तर स्टार्कला सलग दोन षटकार मारले. इतर फलंदाजांना खेळपट्टीवर टिकता आलं नाही अन् दुसरीकडे पटेलने स्टार्कलाच फोडलं.

अक्षर पटेल 29 धावा करून नाबाद राहिला, 26 व्या षटकामध्ये त्याने पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर कडक सिक्स मारले. अक्षर बेधडकपणे स्टार्कचा सामना करत होता. तिसऱ्या चेंडूवर त्याने स्ट्राईक रोटेट केली नाही आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव घेतली. मोहम्मद सिराज याला दोन चेंडू खेळायचे होते. मात्र दोन्ही चेंडूंवर त्याला धाव सोडाच मात्र आपली विकेटही वाचवता आली नाही.

 

अक्षर पटेलने मारलेल्या दोन सिक्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. नेटकरही त्याचं कौतुक करत आहेत. आताच झालेल्या बॉर्डर गावसकर मालिकेमध्येही त्याने दमदार कामगिरी केली होती. भारतीय संघाचा भविष्यातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून त्याकडे पाहिलं जात आहे.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाच्या सलामीवीर रोहित शर्मा 13 आणि शुबमन गिल 0, सुर्यकुमार यादव 0, आणि के. एल. राहुल 9 धावांवर एकट्या स्टार्कने माघारी पाठवलं. विराट कोहली 31 आणि अक्षर पटेल नाबाद 29 यांनी सर्वाधिक धावा केल्या. भारताचे वेगवान गोलंदाज कांगारूंना दिलेलं लक्ष्य पूर्ण करण्यापासून रोखतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.