आंद्रे रसेल एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू असून त्याने आपल्या बॅट आणि गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. आंद्रे रसेल मेजर लीग क्रिकेट 2024 स्पर्धेत लॉस एंजिल्स नाईटरायडर्स टीमकडून खेळतो. रविवारी मॉरिसविलेच्या चर्च स्ट्रीट पार्कमध्ये लॉस एंजिल्स नाईटरायडर्स आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल वॉशिंग्टन फ्रीडमने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॉस एंडेल नाईटरायडर्सने 18.4 षटकात सर्व गडी गमवून 129 धावा केल्या. तसेच विजयासाठी 130 धावांचं आव्हान दिलं. वॉशिंग्टन फ्रीडमने 16 षटकात 2 गडी गमवून हे आव्हान पूर्ण केलं. ट्रेव्हिस हेडने 54, तर स्टीव्ह स्मिथने नाबाद 42 धावांची खेळी केली. हे विजयी आव्हान गाठण्यासाठी ट्रेव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ ही जोडी मैदानात आली होती.या डावातील दुसरं षटकात एक वेगवान आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. हा चेंडूं मारण्यासाठी ट्रेव्हिस हेडने भात्यातून पूल शॉट काढला. पण त्याच्या बॅटीचे दोन तुकडे झाले.
चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला. हेडच्या हाती बॅटचं फक्त हँडल राही आणि बाकीचा भाग मिड विकेटच्या जवळ गेला. यामुळे हेडलाही आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हेडने 32 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 54 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 36 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नाबाद 42 धावांची खेळी केली. “खेळपट्टी संथ होती. मागच्या सामन्यापेक्षा ही खेळपट्टी जास्त वळण घेत होती”, असं ट्रेव्हिस हेडने सांगितलं.
वॉशिंग्टन फ्रीडम (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), रचिन रवींद्र, ग्लेन मॅक्सवेल, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), मुख्तार अहमद, ओबस पिनार, मार्को जॅनसेन, इयान हॉलंड, लॉकी फर्ग्युसन, सौरभ नेत्रावलकर.
लॉस एंजेलिस नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): जेसन रॉय, सुनील नरेन (कर्णधार), उन्मुक्त चंद (विकेटकीपर), शकीब अल हसन, डेव्हिड मिलर, आंद्रे रसेल, सैफ बदर, नितीश कुमार, शेडली व्हॅन शाल्कविक, अली खान, स्पेन्सर जॉन्सन