आयपीएल 2025 मेगा लिलावाची उत्सुकता दिवसागणित आणखी वाढत चालली आहे. 24 आणि 25 नोव्हेंबरला खेळाडूंच्या नशिबाचा फैसला सौदी अरेबियाच्या जेद्दाहमध्ये होणार आहे. यात एकूण 1574 खेळाडूंनी नाव नोंदवलं आहे. यात 1165 भारतीय, तर 409 विदेशी खेळाडू आहेत. यापैकी 204 खेळाडूंना संधी मिळणार आहे. असं असताना भारताचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने युट्यूब चॅनेलवर एक मॉक ऑक्शन केलं. या मॉक ऑक्शनमध्ये चाहत्यांनी आयपीएलच्या सर्व 10 संघांसाठी बोली लावली. पंजाब किंग्सने या बोलीत सर्वात दिग्गज खेळाडूंवर बोली लावली. कारण मेगा लिलावात सर्वाधिक पैसे असणारी एकमेव फ्रेंचायझी आहे. पंजाब किंग्सने दोन अनकॅप्ड प्लेयर रिटेन केले आहेत. त्यांच्यासाठी 9.5 कोटी खर्च केले आहेत. तर 110.5 कोटी हातात शिल्लक आहे. प्रभसिमरन सिंगसाठी 4 कोटी, तर शशांग सिंगसाठी 5.5 कोटी रुपये मोजले आहेत. त्यामुळे आर अश्विनकडून करण्यात आलेल्या मॉक ऑक्शनमध्ये पंजाब टीमने आपल्या शिल्लक रकमेचा पुरेपूर फायदा उचलला. त्यांनी ऋषभ पंतवर सर्वाधिक बोली लावली. दिल्ली कॅपिटल्सने ऋषभ पंतला रिलीज केलं आहे. त्यामुळे इतर फ्रेंचायझींचा त्याच्यावर नजर आहे.
अश्विनकडून करण्यात आलेल्या मॉक ऑक्शनमध्ये सर्वच संघांनी पंतवर बोली लावली. यात पंजाब किंग्सने बाजी मारली. फॅन्सने या माध्यमातून 20.5 कोटी देऊन त्याला संघात घेतलं. ऋषभ पंत सध्या फॉर्मात आहे. अपघातानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं आहे. कसोटी सामन्यातील त्याची शतकी खेळी पाहून कोणीही त्याला आपल्या संघात घेण्यासाठी तयार असेल. इतकंच काय तर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगवरही मोठी बोली लागली. पण पंजाब किंग्सने इथेही बाजी मारली. राइट टू कार्डचा वापरत त्याला 13.5 कोटींना खरेदी केलं.
दुसरीकडे, मॉक ऑक्शनमध्ये फाफ डुप्लेसिसवरही बोली लागली. पंजाबने त्याच्यासाठी 5.5 कोटी रुपये मोजले. तर ग्लेन मॅक्सवेलला संघात घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच झाली. त्याच्यासाठी पंजाबने 9.5 कोटी मोजले आणि संघात घेतलं. वेगवान गोलंदाज कगिसो रबाडासी पंजाबने राईट टू मॅच कार्ड वापरलं आणि त्याला संघात घेतलं. यासाठी पंजाबने 10 कोटी खर्च केले. आयपीएलमधील वेगवान गोलंदा युझवेंद्र चहलसाठीही बोली लागली. पंजाबने त्याच्यासाठछी 11 कोटी रुपये मोजले.