Captaincy : क्रिकेट बोर्डाची मोठी घोषणा, या खेळाडूची वनडे-टी 20i कर्णधारपदी निवड, कोण आहे तो?

| Updated on: Oct 27, 2024 | 6:14 PM

Odi And T20i Captaincy : क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरुन नव्या कर्णधाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली आहे. जाणून घ्या कोण आहे तो?

Captaincy : क्रिकेट बोर्डाची मोठी घोषणा, या खेळाडूची वनडे-टी 20i कर्णधारपदी निवड, कोण आहे तो?
rohit sharma virat kohli and Mohammad Rizwan ind vs pak
Image Credit source: bcci
Follow us on

टीम इंडियाला शनिवारी न्यूझीलंडकडून दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाने यासह 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली. तर दुसऱ्या बाजूला शेजारी पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पिछाडीवर पडल्यानतंर सलग 2 सामने जिंकत इंग्लंड विरुद्ध 2-1 फरकाने मालिका जिंकली. पाकिस्तानने यासह 3 वर्षांनी मायदेशात कसोटी मालिका जिंकली. या विजयाला काही तास होत नाहीत त्यानंतर आता पाकिस्तानच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानने टी 20i आणि वनडे संघासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. येत्या 2025 साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या हिशोबाने रिझवानला कर्णधार करणं हा पाकिस्तानचा मोठा निर्णय आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान याची टी 20i आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. पीसीबीने सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. रिझवान ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून नेतृत्वाची सूत्र स्वीकारणार आहे. पाकिस्तानला काही महिन्यांपूर्वी टी 20i वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करता आली नव्हती. बाबर आझम याने त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. बाबरने 1 ऑक्टोबरला कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता अनेक दिवसांनी अखेर पाकिस्तानला नवा कर्णधार मिळाला आहे.

उपकर्णधार कोण?

दुसऱ्या बाजूला पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सलमान आगा याला उपकर्णधारपदाची सूत्रं दिली आहेत. “टीमला आवश्यक सर्व मदत करु. आपल्या युवा खेळाडूंना सपोर्ट करण्याच गरज आहे. आम्हाला देशांतर्गत क्रिकेटमधील पाया मजबूत करण्याची गरज आहे”, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख मोहसिन नकवी पत्रकार परिषदेत म्हणाले.

मोहम्मद रिझवान पाकिस्तानचा नवा कर्णधार

पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया दौरा

दरम्यान पाकिस्तान ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी20i सीरिज खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 4 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. तर 14 नोव्हेंबरपासून टी 20i सीरिजला सुरुवात होणार आहे. तिसरा आणि अंतिम सामना हा 18 नोव्हेंबरला पार पडणार आहे.