Team India : दिग्गज खेळाडूला या वर्षी संधी नाहीच, चॅम्पियन्स ट्रॉफीत निवडीची आस

| Updated on: Oct 25, 2024 | 11:04 PM

दक्षिण अफ्रिका दौरा आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण दिग्गज खेळाडूचं या दोन्ही संघात नाव नाही. त्यामुळे पु्न्हा एकदा क्रीडारसिकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. थेट आता पुढच्या वर्षीच संधी मिळण्याची शक्यता आहे.

Team India : दिग्गज खेळाडूला या वर्षी संधी नाहीच, चॅम्पियन्स ट्रॉफीत निवडीची आस
Image Credit source: BCCI
Follow us on

भारतीय संघ पुन्हा एकदा पराभवाच्या चक्रव्युहात अडकली आहे. न्यूझीलंडकडून पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यातही पराभवाचं सावट आहे. त्यामुळे मालिका गमवण्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणितही चुकणार आहे. त्यामुळे क्रीडारसिकांमध्ये धाकधूक लागून आहे. असं असताना भारतीय निवड समितीने दक्षिण अफ्रिका दौरा आणि बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर केलं आहे. या संघात एका खेळाडूचं नाव क्रीडाप्रेमी आहे की नाही हे वारंवार पाहात होते. पण त्याला संधी मिळाली नाही. हे नाव दुसरं तिसरं कोणी नसून दिग्गज गोलंदाज मोहम्मद शमीचं आहे. मोहम्मद शमी वनडे वर्ल्डकप 2023 पासून टीम इंडियाचा भाग नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो लवकरच रिकव्हर होईल असं वाटत होतं. पण एक वर्षाचा कालावधी लोटूनही फिट अँड फाईन नाही. त्यामुळे त्याची निवड दोन्ही दौऱ्यात केली गेली नाही.

पुढच्या महिन्यात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी20 मालिका असून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ जाणार आहे. तर रोहित शर्माच्या नेतृत्वात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यात न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहिल्याने आता या मालिकेचं महत्व वाढलं आहे. आता भारतावर विजयाचं प्रेशर असणार आहे. ही मालिका जानेवारी 2025 पर्यंत चालणार आहे. त्यामुळे मोहम्मद शमी थेट पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. या संघात निवड होईल की नाही ते आता सांगता येणं कठीण आहे.

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) , आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.

राखीव: मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 4 टी-20 सामन्यांसाठी भारताचा संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , अर्शदीप सिंग, विजयकुमार विशक, आवेश खान, यश दयाल.