Video : दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी मोहम्मद शमीने घेतले फलंदाजीचे धडे, बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल ‘क्या बात’

| Updated on: Dec 13, 2023 | 5:52 PM

मोहम्मद शमीनं वनडे वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून दिली आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे दिग्गज फलंदाजांची भंबेरी उडाली होती. आता दक्षिण अफ्रिका दौऱ्यात दोन कसोटी सामन्यांसाठी त्याची संघात निवड केली आहे. आपल्या भेदक गोलंदाजीने तो दक्षिण अफ्रिकेला अडचणीत आणेल. पण त्याची फलंदाजी पाहून गोलंदाजांनाही अडचणीत आणेल यात शंका नाही.

Video : दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी मोहम्मद शमीने घेतले फलंदाजीचे धडे, बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात
Video : मोहम्मद शमीने चेंडू सोडून हाती धरली बॅट, फलंदाजी पाहून तुम्हीही व्हाल आवाक्
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात ही मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेत मोहम्मद शमीही चमूत आहे. पण दुखापतीमुळे तो दक्षिण अफ्रिका दौऱ्यात खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. आता मोहम्मद शमीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे या मालिकेपूर्वी तो फिट अँड फाईन होईल यात शंका नाही. या व्हिडीओत क्रीडारसिकांना त्याचा वेगळाच अंदाच पाहायला मिळाला. त्याच्या हातात चेंडू ऐवजी बॅट दिसली. इतकंच काय तर त्याने फलंदाजीचा जोरदार सराव केला. नेटमध्ये फलंदाजीसाठी त्याने चांगलाच घाम गाळला. शमी यावेळी एकापेक्षा एक सरस शॉट्स खेळताना दिसला. दक्षिण अफ्रिकेत मोहम्मद शमी गोलंदाजीसोबत फलंदाजीतही आपली सोडेल असंच यावरून आतातरी वाटत आहे.

मोहम्मद शमीला नेटमध्ये नवोदित खेळाडू गोलंदाजी करत होते. या गोलंदाजांचा त्याने सामन केला. चेंडू सहज बॅटच्या मधोमध आदळत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्याची नजर आणि बॅटची हालचाल एकदम परफेक्ट असल्याचं दिसून येत आहे. यावेळी त्याने सर्वच बाजूंना फटकेबाजी केली. एक दोन शॉट्स तर पुढे येऊन मारले. त्यामुळे शमी गोलंदाजीसोबत चांगली फलंदाजी करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको.

टीम इंडिया 32 वर्षात एकही कसोटी सामना दक्षिण अप्रिकेत जिंकलेली नाही. त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाकडून अपेक्षा आहेत. टीम इंडियात जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमीसारखे भेदक गोलंदाजी करणारे खमके गोलंदाज आहेत. त्यांची गोलंदाजी विदेशी खेळपट्टीवर जबरदस्त कामगिरी करेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये त्यांनी तशी साजेशी कामगिरी केली आहे. 26 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना आहे.

कसोटीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड़, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.