अहमदाबाद | चेन्नई सुपर किंग्स टीम गुजरात टायटन्स संघाला पराभूत करत आयपीएल 2023 ची विजेता ठरली आहे. चेन्नईने हा महाअंतिम सामना 5 विकेट्सने जिंकून तब्बल पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. गुजरातने पहिले बॅटिंग करत चेन्नईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र पावसामुळे डकवर्थ लुईस नियनामुसार चेन्नईला 15 ओव्हरमध्ये 171 धावांचं सुधारित आव्हान मिळालं. चेन्नईने हे विजयी आव्हान 5 विकेट्सच्या मोबदल्यात शेवटच्या बॉलवर पूर्ण केलं. रविंद्र जडेजा चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. जडेजाने चेन्नईला विजयासाठी शेवटच्या 2 बॉलमध्ये 10 धावा करत सनसनाटी आणि चित्तथरारक विजय मिळवून दिला.
चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड याने 26,डेव्हॉन कॉनव्हे याने 47, शिवम दुबे याने 32*,अजिंक्य रहाणे याने 27, अंबाती रायुडू याने 19 आणि रविंद्र जडेजा याने 15* धावांची खेळी केली. तर गुजरातकडून मोहित शर्मा याने 3 विकेट्स घेतल्या. तर नूर अहमद याने 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
दरम्यान चेन्नईने त्याआधी टॉस जिंकला. गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. गुजरातने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 214 धावा केल्या. गुजरातकडून साई सुदर्शन याने सर्वाधिक 96 धावा केल्या. ऋद्धीमान साहा याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. शुबमन गिल 39 रन्स करुन आऊट झाला.
कॅप्टन हार्दिक पंड्या याने अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करत नॉट आऊट 21 रन्स केल्या. तर राशिद खान याला भोपळाही फोडता आला नाही. चेन्नईकडून मथिश पथिराना याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर रविंद्र जडेजा आणि दीपक चाहर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
चेन्नई ट्रॉफी जिंकली. मात्र ऑरेन्जसह पर्पल कॅपही गुजरात टीमच्या खेळाडूंनी जिंकली आहे. चेन्नईच्या खेळाडूंपैकी ऑरेन्ज आणि पर्पलपैकी कोणती एकही कॅप जिंकली असती, तर दुधात साखर पडल्यासारखं झालं असतं. मात्र चेन्नईच्या खेळाडूंना तसं काही जमलं नाही. ऑरेन्ज कॅप शुबमन गिल याने पटकावली. तर मोहम्मद शमी पर्पल कॅपचा विजेता ठरला आहे. मोहम्मद शमीने या मोसमात एकूण 28 विकेट्स घेतल्या. अनेक वर्षांनी दोन्ही कॅप्स या भारतीय खेळांडूनी जिंकण्याची किमया केली आहे.
टीमचं नाव | गोलंदाजाचं नाव | एकूण सामने | एकूण विकेट्स | सर्वोत्तम कामगिरी |
गुजरात टायटन्स | मोहम्मद शमी | 17 | 28 | 11/4 |
गुजरात टायटन्स | मोहित शर्मा | 14 | 27 | 10/5 |
गुजरात टायटन्स | राशिद खान | 17 | 27 | 30/4 |
मुंबई इंडियन्स | पीयूष चावला | 16 | 22 | 22/3 |
राजस्थान रॉयल्स | युझवेंद्र चहल | 14 | 21 | 17/4 |
पर्पल कॅपच्या यादीत शमीनंतर मोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहितने 3 विकेट्स घेत थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. यामुळे राशिद खान याची तिसऱ्या, पीयूष चावला याची चौथ्या आणि युझवेंद्र चहलची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे.
मोहम्मद शमी पर्पल कॅप विनर
Purple Cap holder @MdShami11 scalped 2️⃣8️⃣ wickets during the season to bag the Purple Cap ??
Congratulations to the #TATAIPL Finalist on a wonderful season with the ball ??#Final | #CSKvGT pic.twitter.com/qy0qRmqKwj
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग इलेव्हन | महेंद्रसिंह धोनी (कॅप्टन आणि विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, दीपक चहर, मथीशा पाथीराना, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन | हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद आणि मोहम्मद शमी.