नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं (Mohammed Shami) मंगळवारी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तीन बळी घेत 50 षटकांच्या फॉर्मेटमध्ये 150 विकेट घेतल्या. शमी भारताकडून वनडे क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 150 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अजित आगरकर (Ajit Agarkar), झहीर खान (Zaheer Khan) यांसारख्या दिग्गज खेळाडूंना त्याने मात दिली आहे. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध 110 धावांत गारद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा रोहित शर्माचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरविला. यादरम्यान जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं 30 धावा केल्या.
Mohammed Shami becomes fastest Indian to take 150 ODI wickets
Read @ANI Story | https://t.co/HaIJBDjztl#MohammedShami #ENGvsIND #ODI pic.twitter.com/Vh52JlFZ2T
— ANI Digital (@ani_digital) July 12, 2022
शमीआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट घेणारा भारतीय अजित आगरकर होता. त्यानं 97 सामने खेळून हा विक्रम केला होता. तर झहीर खानने 103 सामन्यात 150 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, मोहम्मद शमीने 80 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठून इतिहास रचला आहे.
जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचं तर मिचेल स्टार्कच्या नावावर सर्वात जलद 150 एकदिवसीय विकेट घेण्याचा विक्रम आहे. त्याने 77 सामन्यांमध्ये हा विक्रम केला आहे, तर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सकलेन मुश्ताक (78) दुसऱ्या क्रमांकावर आहे. शमीने राशिद खानची बरोबरी करत तिसऱ्या क्रमांकावर आपले नाव नोंदवले आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 एकदिवसीय विकेट घेणारा सर्वात वेगवान गोलंदाज
कमी चेंडूत 150 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत शमी तिसऱ्या क्रमांकावर आहे. मिचेल स्टार्कने हा टप्पा गाठण्यासाठी 3917 चेंडू घेतले. तर अजंता मेंडिसने 4053 चेंडूत हा विक्रम केला. शमीने 4071 चेंडूत 150वी विकेट घेतली.
एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा संपूर्ण संघ भारताविरुद्ध 110 धावांत गारद झाला. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा रोहित शर्माचा निर्णय वेगवान गोलंदाजांनी योग्य ठरविला. यादरम्यान जसप्रीत बुमराहनं 6, मोहम्मद शमीने 3 आणि प्रसिद्ध कृष्णानं एक विकेट घेतली. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलरनं 30 धावा केल्या.