Video : वर्ल्ड कपमधील निवडीबाबत मोहम्मद शमी दिलखुलासपणे बोलला, रोहित आणि द्रविडला…

| Updated on: Sep 03, 2024 | 6:39 PM

टीम इंडियामध्ये झालेला वन डे वर्ल्ड कप 2023 प्रत्येक भारतीयाच्या मनात मोठी जखम करून गेला होता. फायनल सामन्यामध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला होता. या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सुरूवातीला टीममध्ये जागा मिळत नव्हती. मात्र जेव्हा त्याला संधी मिळाली त्याने धुमाकूळ घातला होता. यावर मोहम्मद शमी याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Video : वर्ल्ड कपमधील निवडीबाबत मोहम्मद शमी दिलखुलासपणे बोलला, रोहित आणि द्रविडला...
Follow us on

टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी वर्ल्ड कपनंतर मैदानामध्ये उतरला नाही. वन डे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमी याने दमदार कामगिरी केली होती. सुरूवातीच्या सामन्यात शमीला संधी मिळाली नाही. पण ज्यावेळी त्याला संधी मिळाली तेव्हा त्याने दमदार कामगिरी करत टीमसाठी महत्त्वाची भूमिका बजावली. कारण वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. मोहम्मद शमीली टीममध्ये जागा मिळत नव्हती याबाबत विचारल्यावर तो काय म्हणाला जाणून घ्या.

मला आता याची सवय झाली आहे. 2015, 2019 आणि 2023 मध्येही माझी सुरूवात अशीच झाली होती. पण मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी दमदार कामगिरी केली. त्यानंतर रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी मला बाहेर ठेवण्याचा विचार केला नाही. मी कायम संधी मिळाल्यावर त्यासाठी तयार असतो. त्यावेळी तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकता, नाहीतर मी पाणी देण्यासाठी मैदानात जातच असतो, असं मिश्किलपणे मोहम्मद शमी म्हणाला. CEAT क्रिकेट पुरस्कारावेळी शमी बोलत होता.

 

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड शमीचे हे बोलणं ऐकल्यावर हसू लागले. मोहम्मद शमीने रोखठोकपणे दिलेल्या उत्तराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमाला आजी-माजी खेळाडूंनी उपस्थिती लावली होती. मोहम्मद शमी टीम इंडियाचा मुख्य गोलंदाज आहे. वर्ल्ड कप झाल्यावर शमी दुखापती झाला होता, त्याच्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये शमी खेळू शकला नाही. मोहम्मद शमीच्या जागी टीम इंडियामध्ये अर्शदीप सिंह याची निवड झाली होती. अर्शदीपनेही वर्ल्डकपमध्ये संघासाठी दमदार कामगिरी करत विजयाचत मोलाची भूमिका बजावली.