मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेल की नाही? रोहित शर्माने खरं काय ते सांगून टाकलं

| Updated on: Oct 15, 2024 | 2:59 PM

भारत न्यूझीलंड कसोटी मालिकेला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. यावेळी त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्याचाही उल्लेख केला. मोहम्मद शमी या दौऱ्यात असणार की नाही? याबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

मोहम्मद शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असेल की नाही? रोहित शर्माने खरं काय ते सांगून टाकलं
Image Credit source: PTI
Follow us on

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. पायावर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर रिकव्हर झाला होता. तसेच मैदानात सराव देखील सुरु केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियासोबत असेल क्रीडाप्रेमींना वाटत होतं. असं असताना त्याला पुन्हा दुखापत झाल्याची माहिती समोर आली होती. पण त्याने स्वत: या बातमीचं खंडन केलं होतं. पण आता कर्णधार रोहित शर्माने त्याची पोलखोल केली आहे. रोहित शर्माने बंगळुरुत झालेल्या पत्रकार परिषदेत मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत खुलासा केलाआहे. रोहित शर्माने सांगितलं की, मोहम्मद शमी पूर्णपणे ठीक नाही आणि त्याची दुखापत जास्त आहे. त्यामुळे त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नेणं खूपच कठीण आहे.

कर्णधार रोहित शर्माने सांगितलं की, ‘प्रामाणिकपण सांगतो की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मोहम्मद शमीला नेणं खूपच कठीण आहे. त्याला आणखी धक्का बसला आहे आणि त्याच्या गुडघ्याला सूज आली आहे. आता त्याला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. शमी एनसीएमध्ये डॉक्टर आणि फिजिओसोबत आहे. आम्हाला दुखापतग्रस्त शमीला ऑस्ट्रेलियाला न्यायचं नाही.’ काही दिवसांपूर्वी शमीने दुखापतीच्या बातम्या धुडकावून लावल्या होत्या. मात्र रोहित शर्माच्या वक्तव्याने त्याला दुजोरा मिळाला आहे.

दुखापतीच्या बातम्या सोशल मीडियावर आल्यानंतर मोहम्मद शमीने सांगितलं होतं की, ‘त्या सर्व निराधार बातम्या आहेत. मी बरा होण्यासाठी प्रयत्न करत आहे. बीसीसीआय आणि मी बॉर्डर गावस्कर मालिकेतून बाहेर असल्याचं म्हंटलेलं नाही.’ तसेच या बातम्यांकडू दुर्ल करण्याचं आव्हान त्याने चाहत्यांना केलं होतं. पण आता रोहित शर्मानेच त्या बातमीचा उलगडा केला आहे. त्यामुळे नेमकं कोण खोटं बोलतंय? यावर प्रश्नचिन्ह आहे. आता मोहम्मद शमी काय प्रतिक्रिया देतो याकडे लक्ष लागून आहे. मोहम्मद शमी बांगलादेश दौऱ्यातून कमबॅक करेल असं सांगण्यात येत होतं. त्यानंतर रणजी स्पर्धेत खेळेल अशी चर्चा रंगली. तसेच न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात असेल अशी चर्चा सुरु झाली. पण शमी कुठेच दिसला नाही. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्याची चर्चा रंगली असताना रोहित शर्माचं विधान महत्त्वाचं ठरत आहे.