केपटाऊन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया यांच्यात केपटाऊन न्यूलँड्स येथे दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने दक्षिण आफ्रिकेचं कंबरडं मोडून काढलंय. मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेला 5 झटके देत पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. मोहम्मद सिराजच्या बॉलिंगचा दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरला सामना करता आला नाही. सिराजच्या बॉलिंगसमोर फलंदाजांनी पूर्णपणे लोटांगण घातलं.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर याने आपल्या अखेरच्या सामन्यात टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने आमचीही पहिली पसंती बॅटिंगलाच असल्याच म्हटलं. मात्र मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगच्या निर्णयाची हवाच काढली. सिराजने एक एक करत 5 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे सिराजने अवघ्या 9 धावांच्या मोबदल्यात या 5 विकेट्स मिळवल्या.
मोहम्मद सिराजने मार्को जान्सेन याला आऊट करत 5 विकेट्स पूर्ण केल्या. सिराजने त्याआधी एडन मारक्रम, डीन एल्गर, टोनी डी झोर्झी आणि डेव्हिड बेडिंगहॅम या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराजची टेस्ट क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिके विरुद्ध 5 विकेट्स घेण्याची पहिली आणि एकूण तिसरी वेळ ठरली.
सिराजकडून दक्षिण आफ्रिकेचा पंचनामा
That’s a 5-FER for @mdsirajofficial 🔥🔥
His first five-wicket haul in South Africa and third overall.#SAvIND pic.twitter.com/lQQxkTNevJ
— BCCI (@BCCI) January 3, 2024
मोहम्मद सिराज याने याआधी वेस्ट इंडिज विरुद्ध त्रिनिदादमध्ये 2023 साली 60 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर त्याआधी पहिल्यांदा 2021 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत ब्रिस्बेनमध्ये 73 रन्स देत 5 जणांना मैदानाबाहेर पाठवलं होतं.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि मुकेश कुमार
दक्षिण आफ्रिका प्लेईंग इलेव्हन | डीन एल्गर (कॅप्टन), एडन मारक्रम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकटेकीपर), मार्को जान्सेन, केशव महाराज, कगिसो रबाडा, नांद्रे बर्गर आणि लुंगी एनगिडी.