मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधारा महेंद्र सिंह धोनी निवृत्त झाला असला तरीसुद्धा त्याची अजुनही तितकीच क्रेज आहे. धोनीला क्रिकेटला रामराम करून 3 वर्षे झाली आहेत. मात्र आयपीएलमध्ये धोनीची जलवा सर्वांनीच पाहिला असून त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात. धोनी जगभर प्रसिद्ध असून आता तो अमेरिकेमध्ये सट्ट्यांसाठी गेला आहे. अमेरिकेतील धोनी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्रध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
MS Dhoni and former US President Donald Trump in a Golf Game.
– MSD, an icon, a legend….!!!! pic.twitter.com/d9o1TfHmSX
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 8, 2023
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांनी धोनासोबत गोल्फ खेळण्यासाठी आयोजन केलं होतं. धोनाली गोल्फ खेळायलाही खूप आवडतं. धोनी यूएस ओपन 2023 मध्ये कार्लोस अल्काराज आणि झ्वेरेव यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीची मॅच पाहण्यासाठी आला होता. महेंद्रसिंग धोनीचे जवळचे उद्योगपती हितेश संघवी यांनी इंन्टाग्रामवर शेअर केला आहे. धोनी, डोनाल्ड ट्रम्प आणि राजीव नाईक यांच्यासोबत गोल्फ खेळताना, माजी राष्ट्रपतींनी गोल्फचं आयोजन केलं त्याबद्दल सिंंघवी यांनी आभार व्यक्त केले.
धोनाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यंदाच्या इंडिअन प्रीमिअर लीगमध्ये धोनीला चांगलाच पाठिंबा मिळाला. कोणत्याही मैदानावर सामना असूदेत धोनीला भरभरून प्रेम दिलं. चेन्नईच्या मैदानावर सामना नसला तरीसुद्धा संपूर्ण स्टेडिअममध्ये चाहत धोनीसाठी गर्दी करत होते.
दरम्यान, माहीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20, 2011 साली वन डे वर्ल्ड कप आणि 2013 साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. त्यासोबतच धोनीने सीएसकेला सर्वाधिक पाचवेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावून दिली आहे.