मुंबई : सीएकेचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा फॅन बेस सर्वांना माहित आहे. त्याची झलक आयपीएलच्या फायनलमध्ये दिसून आली होती. तीन दिवस चालेल्या फायनलमध्ये सीएसकेच्या चाहत्यांनी पाऊस, वाऱ्याची पर्वा न करत स्टेडिअममध्ये सपोर्ट करत होते. त्यामुळे माही बाहरे कुठे दिसला तर त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो घेण्यासाठी चाहते गर्दी करतात. धोनीही त्याच्या चाहत्यांना तसा जपतो याची झलक एका व्हिडीओमधून दिसून आली.
धोनीचा हा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मुंबईचा आहे. ट्रॅफिक सिग्नलवर माही कारमध्ये होता त्यावेळी एक स्कूटी थांबल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. धोनीला पाहून फॅन खूश होतो आणि त्याला सेल्फीसाठी हट्ट करतो करतो. धोनीनेही गाडीची काच खाली करत त्याला सेल्फी घेऊ दिला. धोनीसोबत सेल्फी घेतल्यावर फॅनच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नव्हता. धोनी सर्जरीसाठी मुंबईत आला होता.
डॉ. दिनशॉ पारदीवाला यांनीच काही महिन्यापूर्वी टीम इंडियाच्या एका क्रिकेटवर शस्त्रक्रिया केली होती. त्यांनी रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतवर शस्त्रक्रिया केली होती. आता त्यांनी एमएस धोनीवर ऑपरेशन केलय. पंतच्या गुडघ्यावर तब्बल 3 तास ऑपरेशन सुरु होतं. पंतच्या उजव्या पायाचा लिगामेंट अपघातात फाटला होता.
स्टार खेळाडू महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली सीएसकेने आयपीएल 2023 ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची क्रेज किती आहे हे आयपीएलमध्ये दिसून आलं आहे. धोनीची शेवटची आयपीएल असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे सीएसकेच्या प्रत्येक मॅचला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसत होती. धोनीने यंदाच्या आयपीएलमध्ये पायाचं दुखणं अंगावर काढलं. पायाला म्हणजेच धोनीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. आयपीएल झाल्यावर त्याने लगोलग सर्जरी करून घेतली.