धोनी (MS Dhoni) आणि चपळाई, या दोन्ही शब्दांचे अर्थ एक आहे, असं याआधीही म्हटलं गेलंय. आणि यापुढेही म्हटलं जाईल. कारण आयपीएलच्या सामन्यात धोनीनं आपल्या फिटनेसची झलक पुन्हा एकदा दाखवली. धोनी आता म्हातारा झालाय, वगैरे टीका करणाऱ्यांना धोनीनं एका रनआऊटमधून चोख प्रत्युत्तर दिलंय. हा रनआऊट खासही आहे आणि फास्टही! विकेट्सच्या मागे धोनीचा नाद नाही करायचा, असं एकेकाळी म्हटलं जात होतं. आजचही तसंच म्हणावलं लागेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी धोनी निवृत्त झाला असला, तरिही अजूनही विकेट्समागे धोनी होता तसाच आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. सामना होता सीएसके विरुद्ध पंजाब (CSK vs PBKS). दिवस रविवारचा. दोन ओव्हरमध्ये दोन विकेट्स गमावलेल्या पंजाबला धोनीनं आपल्या फिटनेसनं उत्तर दिलं. धोनीनं केलेला रनआऊच्या 2022 च्या आयपीएलमध्ये (IPL 2022) तर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेच. शिवाय आयपीएलच्या इतिहासातही याची खासमखास चर्चा होईल, याच शंका नाही.
2022चा पंजाब विरुद्ध चेन्नई सामना सुरु होता. टॉस चेन्नईनं जिंकला. बॉलिंगचा निर्णय झाला. पंजाबचे बॅट्समन मैदानात उतरले. पहिल्या दोन ओव्हरमध्ये पंजाबला दोन मोठे धक्के बसले.
दुसऱ्याच ओव्हरमध्ये क्रिक जॉर्डनच्या बॉलिंगवेळी भानुका राजापक्षाने एक बचावात्मक शॉट खेळला. बॉल क्रीझवर होता. राजापक्षा आणि शिखर धवन यांना एक रन चोरायचा होता. पण ही एक धाव चोरी करणं त्यांना चांगलंच महागात पडलं.
क्रीझमधून दोघेही रनसाठी बाहेर पडलेच होते. पण मधल्यामध्ये होय-नको झालं. दोघांचंही कन्फ्युझन वाढलं. त्याच दरम्यान, क्रिस जॉर्डननं बॉल धोनीच्या दिशेनं फेकला.
धोनी जिथं उभा होता, तिथून थेट स्टम्प्सच्या दिशेनं पळत सुटला. स्टम्सजवळ येत धोनीनं बॉल आपल्या ताब्यात घेतला आणि एक जबरदस्त झेप घेत विकेट्स उद्ध्वस्त केल्या. गैरसमज दूर होईपर्यंत भानुका राजपक्षाला उशीर झाला होता. आपण रनआऊट झालो असल्याची जाणीव त्याला झाली.
40 वर्षांच्या धोनीनं रनआऊट केल्यानंतर सगळेच पुन्हा एकदा अवाक् झाले. वय झालंय, पण धोनी अजूनही तितकाच भारी किपर आहे, याची जाणीव सगळ्यांनाच पुन्हा झाली. हर्षा भोगले आणि सुनील गावसकरही धोनीनं केलेला रनआऊट पाहून चकीत झाले होते. दोघांनीही त्यांच्या एथलेटीक कौशल्याचं कौतुक करत जुन्या आठवणीही ताज्या केल्या.
चेन्नईचा थाला असलेल्या धोनीची ही इमेज सीएसकेच्या चाहत्यांना खूपच भावली आहे. पहिल्याच मॅचमध्ये धोनीनं अर्धशतकी खेळी केली. तर दुसऱ्या मॅचही त्याची बॅट चांगलीत तळपली होती. आणि आता आज केलेल्या रनआऊटमुळे धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये बॅक ईन एक्शन दिसून येतोय.
याआधीही धोनीनं धावत येत आशिया कपमध्ये निर्णायक रनआऊट केला होता. त्याची आठवण पुन्हा एकदा चाहत्यांना झाली आहे. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात धोनीनं स्टम्प्सच्या मागून धावत येत रनआऊट करत भारताला विजय मिळवून दिला होता.
Something never changes…? #MSD
Age is just a number ? #Dhoni#Runout #CSKvPBKS pic.twitter.com/TzzOQD478I— Prabhat Singh ❁ (@iampbdawn) April 3, 2022