राजकोट | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याला तिसऱ्या कसोटी सामन्याआधी मुक्त करण्यात आलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत 16 फेब्रुवारी रोजी बिहार विरुद्ध बंगाल असा सामना होणार आहे. या सामन्यासाठी मुकेश कुमार बंगाल टीमसोबत जोडला जाणार आहे. मुकेशला या कारणामुळे टीम इंडियातून मुक्त करण्यात आलं आहे. तर मुकेश रांचीत 24 फेब्रुवारीपासून होणाऱ्या चौथ्या सामन्याआधी पुन्हा परतेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
मुकेश कुमार याला इंग्लंड विरुद्ध विशाखापट्टणममध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज याच्या जागी प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली होती. मात्र मुकेश कुमार याला आपली छाप सोडता आली नाही. मुकेशने टीम इंडियाची बॉलिंगने निराशा केली. आता मुकेश बंगालसाठी बिहार विरुद्ध कोलकातामधील इडन गार्डनमध्ये होणाऱ्या सामन्यात खेळणार आहे.
मुकेश कुमार याला कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. मुकेश टीम इंडिया नवखा आहे. मुकेशने आतापर्यंत 3 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मुकेशने 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच मुकेशने 6 एकदिवसीय आणि 14 टी 20 सामनेही खेळले आहेत. मुकेशला आयपीएल 2023 मध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडिया संधी देण्यात आली. मात्र त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
दरम्यान इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाच्या दोघांनी कसोटी क्रिकेटद्वारे आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या दोघांनी पदार्पण केलं आहे. सरफराज टीम इंडियासाठी टेस्ट डेब्यू करणारा 311 वा आणि ध्रुव जुरेल 312 खेळाडू ठरला आहे.
मुकेश कुमार रिलीज
UPDATE: Mr Mukesh Kumar has been released from the India squad for the third Test against England in Rajkot.
He will join his Ranji Trophy team, Bengal, for the team’s next fixture before linking up with Team India in Ranchi.#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.