MUM vs TN | शार्दूलचा शतकी खेळीनंतर बॉलिंगनेही धमाका, मुंबईची जोरात सुरुवात

| Updated on: Mar 04, 2024 | 1:35 PM

MUM vs TN Semi Final 2 Ranji Trophy | टीम इंडियातून बाहेर असलेल्या शार्दूल ठाकुर याने आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी धमाका केलाय. रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये लॉर्डने बॅटिंगनंतर बॉलिंगनेही कमाल केलीय.

MUM vs TN | शार्दूलचा शतकी खेळीनंतर बॉलिंगनेही धमाका, मुंबईची जोरात सुरुवात
शार्दुलने दोन्ही डावात मिळून एकूण 4 विकेट्स घेतल्या. शार्दूलने दोन्ही डावात प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
Follow us on

मुंबई | रणजी ट्रॉफी 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात मुंबई टीम मजबूत स्थितीत पोहचली आहे. मुंबईने शार्दूल ठाकुर याचं शतक आणि तनुश कोटीयनच्या नाबाद 89 धावांच्या जोरावर तामिळनाडूने केलेल्या 146 धावांच्या प्रत्युत्तरात ऑलआऊट 378 धावा केल्या. मुंबईने 207 धावांची भक्कम आघाडी घेतली. शार्दुलने शतकी खेळीनंतर बॉलिंगनेही धमाका करत तामिळनाडूला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर टाकलं.

तामिळनाडू दुसऱ्या डावात 207 धावांच्या प्रत्युत्तरासाठी बॅटिंगसाठी आली. मात्र शार्दूल ठाकुर याने पहिल्या 5 ओव्हरमध्येच तामिळनाडूला पहिले 2 झटके दिले. शार्दुलने तिसऱ्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर एन जगदीशन याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. जगदीशनला भोपळाही फोडता आला नाही. शार्दूलने त्यानंतर पाचव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर साई सुदर्शन याला 5 धावांवर हार्दिक तामोरे याच्या हाती कॅच आऊट केलं. बीसीसीआयने शार्दूलच्या या 2 विकेट्सच्या व्हीडिओ पोस्ट केला आहे.

हे सुद्धा वाचा

मुंबईचा पहिला डाव

त्याआधी मुंबईची पहिल्या डावात घसरगुंडी झाली होती. मात्र मुशीर खान याच्यानंतर शम्स मुलानी आला तसाच गेला. त्यानंतर शार्दूल ठाकुर याने जबाबदारीने मुंबईचा डाव सावरला. शार्दूलने हाार्दिक तामोरे याच्यासह 105 धावाची निर्णायक शतकी भागीदारी करत मुंबईचा डाव सावरला. त्यानंतर हार्दिक 35 धावा करुन आऊट झाला.

हार्दिकतनंतर तनुषसोबत शार्दूलने नवव्या विकेटसाठी 79 धावा जोडल्या. शार्दूलने या दरम्यान फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक ठोकलं. मात्र 9 धावा जोडल्यानंतर शार्दुल आऊट झाला. शार्दूलने 13 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 109 धावांची खेळी केली. शार्दूलनंतर तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे या दोघांनी 88 धावांची भागीदारी करत मुंबईला 300 पार पोहचवलं. तनुष कोटीयन याने 126 बॉलमध्ये 12 चौकारासंह 89 धावांची खेळी केली. तर तुषार देशपांडे याने 26 धावांचं योगदान दिलं. मुंबईचा डाव अशाप्रकारे 106.5 ओव्हरमध्ये 378 धावांवर आटोपला.

शार्दूल ठाकुरचा धमाका

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, भूपेन लालवाणी, मुशीर खान, शम्स मुलाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.

तामिळनाडू प्लेईंग ईलेव्हन | रविश्रीनिवासन साई किशोर (कॅप्टन), एन जगदीसन (विकेटकीपर), साई सुदर्शन, बाबा इंद्रजीथ, प्रदोष पॉल, विजय शंकर, वॉशिंग्टन सुंदर, एम मोहम्मद, एस अजित राम, संदीप वॉरियर आणि कुलदीप सेन.