मुंबई | मुशीर खान याने वयाच्या 19 व्या वर्षी रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भ विरुद्ध इतिहास रचला. मुशीरने सामन्यातील तिसऱ्या दिवशी दमदार शतक ठोकलं. मुशीरच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील हे दुसरं शतक ठरलं. मुशीरने विदर्भ विरुद्ध 326 बॉलमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 136 धावांची खेळी केली. मुशीरने या शतकी खेळीच्या जोरावर 29 वर्षांआधीचा रेकॉर्ड उध्वस्त केला. मुशीरने कमी वयात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दुसरं शतक ठोकलं. मुशीरने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड ब्रेक केला. सचिनने वयाच्या 22 व्या वर्षाआधी पंजाब विरुद्ध कारकीर्दीतील दुसरं शतक ठोकलं होतं.
वानखेडे स्टेडियममध्ये रणजी ट्रॉफी फायनल सामना आयोजित करण्यात आला आहे. या सामन्याला सचिन तेंडुलकर याच्यासह आजी माजी दिग्गजांनी सामन्याला हजेरी लावली. मुशीरने सचिसमोरच त्याचा 29 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक केला. या सामन्याला मुशीर खानचे वडील नौशाद खान हे देखील उपस्थित होते. मुशीरने वडिलांना शतकी सलामी दिली. तेव्हा नौशाद खान यांच्या आनंदाचा पारावार उरला नाही.
दरम्यान मुशीर खान याने या रणजी ट्रॉफी स्पर्धेत आतापर्यंत खोऱ्याने धावा केल्यात. मुशीरने बाद फेरीत मुंबईसाठी निर्णायक क्षणी संकटमोचकाची भूमिका बजावलीय. मुशीरने क्वार्टर फायनल, सेमी फायनल आणि त्यानंतर फायनलमधील दुसऱ्या डावात बॅटिंगने धमाका उडवून दिला. मुशीरने क्वार्टर फायनलमध्ये द्विशतक, सेमी फायनलमध्ये अर्धशतक आणि फायनलमध्ये शतक ठोकलं.
मुशीरने बडोदा विरुद्ध क्वार्टर फायनलमध्ये द्विशतक ठोकलं. त्यानंतर तामिळनाडू विरुद्ध सेमी फायनलमध्ये अर्धशतक आणि आता फायनलमध्ये शतक केलं. मुशीरने अंतिम फेरीत केलेल्या शतकामुळे मुंबईला मोठी आघाडी घेता आली. मुंबईने विदर्भासमोर दुसऱ्या डावात 418 धावांपर्यंत मजल मारली. तसेच 119 धावांच्या आघाडीच्या मदतीने मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचं आव्हान ठेवलंय. विदर्भाने बिनबाद 10 धावांसह चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केलीय. आता चौथ्या दिवसाच्या खेळाकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.