मुंबई | मुंबईकर सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून राजकोटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर आता त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान याचं नशीब फळफळलं आहे. अंडर 19 वर्ल्ड कप 2024 गाजवल्यानंतर मुशीर खान याला थेट टीमच्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. त्यामुळे खान कुटुंबियांसाठी आजचा दिवस हा अविस्मरणीय ठरला आहे. आता मुशीर खानकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
रणजी ट्रॉफी स्पर्धा 2023-24 च्या प्लेट ग्रुपमधील क्वार्टर फायनल फेरीला आज 23 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या क्वार्टर फायनलमधील दुसऱ्या सामन्यात मुंबई विरुद्ध बडोदा आमनेसामने आहेत. हा सामना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे. मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. तर मुशीर खान याला शिवम दुबे याच्या जागी संधी देण्यात आली.
तर दुसऱ्या बाजूला बडोदा क्रिकेट टीमनेही प्लेईंग ईलेव्हनमध्ये अंडर 19 वर्ल्ड कप टीममधील युवा खेळाडूंना संधी दिली आहे. बडोद्याकडून राज लिंबानी आणि प्रियांशू मुलिया या दोघांचा समावेश करणयात आला आहे. त्यामुळे आता काही दिवसांपूर्वी टीम इंडियासाठी एकाच टीममध्ये खेळलेले हे अंडर 19 स्टार्स एकमेकांविरुद्ध कशी कामगिरी करतात, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुशीर खान याला संधी
Musheer Khan playing for Mumbai And Raj Limbani, Priyanshu Moliya playing for Baroda in #RanjiTrophy Quarter Finals
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) February 23, 2024
दरम्यान सामन्याआधी मुंबई आणि बडोदा या दोन्ही संघांच्या खेळाडूंनी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना श्रद्धांजली वाहिली. मनोहर जोशी यांचं वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईत निधन झालं. माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष राहिलेले मनोहर जोशी यांनी काही काळ एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा कारभारही सांभाळला होता.
बडोदा प्लेईंग ईलेव्हन | विष्णू सोलंकी (कॅप्टन) भार्गव भट्ट, जे के सिंह, एस आय मेरीवाला, महेश पिठीया, मितेश पटेल (विकेटकीपर), एन ए रथवा, प्रियांशू मुलिया, राज लिंबानी, शाश्वत रावत आणि शिवालिक शर्मा.
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार),भुपेन ललवाणी, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), मोहित अवस्थी, मुशीर खान, पृथ्वी शॉ, शम्स मुलानी, शार्दुल ठाकुर, सूर्यांश शेडगे, तनुष कोटीयन आणि तुषार देशपांडे.