MUM vs VID | श्रेयस अय्यर नर्व्हस नाईंटीचा शिकार, फायनलमध्ये 5 धावांनी शतक हुकलं

| Updated on: Mar 12, 2024 | 3:12 PM

Shreyas Iyer | श्रेयस अय्यर शतकापासून अवघ्या 5 धावांपासून दूर होता. मात्र तो दुर्देवी ठरला आणि 95 धावांवर आऊट झाला. श्रेयसने मुशीरसोबत निर्णायक भागीदारी केली.

MUM vs VID | श्रेयस अय्यर नर्व्हस नाईंटीचा शिकार, फायनलमध्ये 5 धावांनी शतक हुकलं
Follow us on

मुंबई | मुंबई क्रिकेट टीमने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये विदर्भ विरुद्ध घट्ट पकड मिळवली आहे. मुशीर खान आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळीची सुरुवात केली. मुशीर आणि अजिंक्य या दोघांनी अर्धशतकानंतर पुढील खेळाची सुरुवात केली. मात्र रहाणे तिसऱ्या दिवशी 73 धावा करुन आऊट झाला. रहाणे आणि मुशीर या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 130 धावा जोडल्या. रहाणे दुर्देवाने शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला.

रहानेनंतर श्रेयस अय्यर मैदानात आला. श्रेयस पहिल्या डावात अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याच्यावर मोठी खेळी करण्याचा दबाव होता. मात्र श्रेयसने क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड केला नाही. श्रेयसने एका बाजूला अर्धशतक पूर्ण केलं. तर त्यानंतर मुशीर खान याने फर्स्ट क्लास क्रिकेटमधील दुसरं शतक ठोकलं. मुशीरनंतर श्रेयसही शतकाच्या उंबरठ्यावर होता. मात्र तो दुर्देवी ठरला.

हे सुद्धा वाचा

श्रेयस नर्व्हस नाईंटीचा शिकार ठरला. श्रेयसचं 5 धावांनी शतक हुकलं. श्रेयस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. श्रेयसला फटका मारायचा होता एका दिशेला तो फटका गेला दुसऱ्या दिशेला. आदित्य ठाकरे याने श्रेयसला आऊट केलं. श्रेयसने 111 बॉलमध्ये 85.59 च्या स्ट्राईक रेटने 95 धावांची खेळी केली. मुशीर खान आणि श्रेयस अय्यर या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 168 धावांचं योगदान दिलं.

श्रेयस अय्यर ठरला दुर्देवी

मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवानी, मुशीर खान, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शम्स मुलाणी, शार्दूल ठाकुर, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे.

विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अक्षय वाडकर (कॅप्टन आणि विकेटकीपर), अथर्व तायडे, ध्रुव शौरे, अमन मोखाडे, करुण नायर, यश राठोड, आदित्य सरवटे, उमेश यादव, हर्ष दुबे, यश ठाकुर आणि आदित्य ठाकरे.