क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी आणि अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं आहे. अमोल काळे यांचं हृदयविकाराच्या झटकाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. अमोल काळे यांचं वयाच्या 47 वर्षी देवाज्ञा झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 9 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सामना पार पडला. अमोळ काळे आणि त्यांचे इतर सहकारी हा सामना पाहण्यासाठी गेले होते. अमोल काळे याचं निधनाने क्रिकेट वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमोळ काळे याच्या अकाळी निधनाने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केलं जात आहे. तसेच अमोल काळेंच्या अचानक एक्झिटमुळे अनेकांना धक्का बसला आहे. अमोल काळे यांचे सहकारी, क्रीडा पत्रकार, विविध क्षेत्रातील दिग्गजांना अमोल काळे यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे. अनेकांनी अमोल काळे यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अमोल काळे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. उद्योगक्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती. तसेच एमसीएची सूत्र हातात घेतल्यानंतर त्यांनी आमूलाग्र बदल केले होते. अमोल काळे यांची ऑगस्ट 2023 मध्ये आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती बालाजी देवस्थान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. तसेच काळे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप आमदार आणि बीसीसीआय खजिनदार आशिष शेलार यांच्या जवळचे होते.
माझं वैयक्तिक नुकसान, काळेंच्या निधनावर आव्हाडांचं ट्विट
Heard the sad news of the demise of #AmolKale President of Mumbai Cricket Association.
Good Organiser and a Cricket lover.
Amol this was not ur age to say good bye to the world
It’s a personal loss to me #RIP pic.twitter.com/W1IdzjJImF— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 10, 2024
अमोळ काळे यांचं परदेशात निधन झाल्याने आता सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात वेळ लागणं अपेक्षित आहे. सर्व कागदोपत्री औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर मृतदेह भारतात आणलं जाऊ शकतं. याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.