Hardik Pandya | रोहितची कॅप्टन्सी काढल्यावर सूर्यकुमार सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?, सूर्याच्या ट्विटमुळे खळबळ!

| Updated on: Dec 16, 2023 | 5:27 PM

Suryakumar viral post on social media : रोहित शर्मा याच्या जागी मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्याला कर्णधार गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. आता या वादात टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबईचा स्टार बॅट्समन हार्दिकने केलेलं ट्विट व्हायरल होत आहे.

Hardik Pandya | रोहितची कॅप्टन्सी काढल्यावर सूर्यकुमार सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?, सूर्याच्या ट्विटमुळे खळबळ!
rohit sharma suryakumar yadav post after hardik captain
Follow us on

मुंबई : आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाने हार्दिक पंड्या याला कर्णधार केल्याचं जाहीर केलं. रोहित शर्मा आता मुंबईचा कॅप्टन राहिला नाही. गुजरात संघाकडून त्याला ट्रेडिंगध्ये माघारी घेत थेट कर्णधारपदाची धुरा सांभाळायला दिली आहे. रोहितला हटवल्यामुळे चाहतेही संतप्त झाले आहेत. कारण एक-दोन नाहीतर संघाला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या रोहितला अशा प्रकारे कर्णधारपदावरून हटवल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या निर्णयामुळे चाहतेच नाहीतर स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवसुद्धा नाराज झालेला दिसत आहे. सूर्यकुमार यादव याच्या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.

सूर्यकुमार यादव याने आपल्या इन्स्टा स्टोरीवर आणि (एक्सवर) म्हणजे ट्विटवर एक हार्टब्रोक झालेला इमोजी टाकला आहे. त्यामुळे चाहत्यांचं म्हणणं आहे की, सूर्यालाही हार्दिकला कप्तान केल्यााचं आवडलं नाही. तर काही चाहते बोलत आहेत की, सूर्या रोहितनंतर कर्णधार होता मात्र त्याचा पत्ता हार्दिकमुळे कट झाला. सूर्यानेही आता मुंबईचा संघ सोडायला हवा. रोहितला कर्णधार म्हणून हटवल्यावर मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सवर जोरदार टीका केली आहे.

सूर्याची पोस्ट

 

रोहितला कॅप्टन पदावरून काढल्याने सूर्यालाही दु:ख झाल्याचं दिसत आहे. मुंबईच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मुंबई इडियन्सला अनफॉलो करत ट्विटरवर #ShameonMI हा ट्रेंड चालवला आहे. मुंबई इंडियन्सचे चार लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स कमी झाले आहेत.

दरम्यान, सूर्यकुमार यादव याच्याकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी तर आता पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तीन सामन्यांच्या टी- 20 मालिकेसाठी संघाचं कर्णधारपद देण्यात आलंं होतं. रोहित शर्मा याच्यानंतर सूर्यकुमार यादव याच्याकडे संघाची कॅप्टन्सी जाण्याची शक्यता होती. मात्र हार्दिक पंड्याला कर्णधार बनवल्याने त्यालासुद्धा वाईट वाटलं असू शकतं. रोहितची यावर अजुनही कोणतीच प्रतिक्रिया आली नाही.