मुंबई : वर्ल्ड कप 2023 सुरू असून भारतीय संघ झकास कामगिरी करत आहे. भारत यंदा वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार मानला जात असून त्याप्रमाणे आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. अशातच आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी असलेल्या मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यॉर्कर किंग लसिथ मलिंगा परत एकदा मलिंगावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
लसिथ मलिंगा याला लॉटरी लागली असून त्याने मुंबई इंडियन्सला अनेक सामने एकहाती जिंकुन दिले आहेत. मलिंगाची मुंबई इंडियन्सच्या मुख्य गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटने मलिंगाकडे आता गोलंदाजीची धुरा सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी निवड होण ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मार्क बाऊचर आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. मुंबईच्या बॉलिंग युनिटमध्ये नवीन टॅलेंटमध्ये चांगली क्षमता असल्याचं लसिथ मलिंगा याने म्हटलं आहे.
लसिथ मलिंगा आधी राजस्थान रॉयल्स संघामध्ये कोचिंगची जबाबदारी पाहत होता. मुंबईला मलिंगाने अनेक सामने जिंकले असून स्ट्राईक बॉलर म्हणून त्याने मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली होती. मुंबईकडून खेळताना प्रत्येक मोसमामध्ये मलिंगाने आपली जबाबदारी चोख पार पाडली. चेन्नईला १ धावांची गरज असताना मलिंगाने सामना मुंबईला जिंकून दिला होता. मलिंगाने मुंबईसाठी 139 सामने खेळले आणि 7.12 च्या इकॉनॉमीने 195 विकेट घेतल्या.
दरम्यान, मलिंगा 2009 पासून मुंबईसोबत होता, 13 वर्षांमध्ये चार आयपीएल विजेतेपद आणि दोन चॅम्पियन्स लीग T20 विजेतेपद जिंकली आहेत. आता झालेल्या मेजर क्रिकेट लीगमध्येही मुंबईने विजेतेपद आपल्या नावावर केलं होतं. आयपीएल 2024 तयारी मुंबई इंडियन्स टीन मॅनेजमेंट आतापासूनच तयारीला लागलेली दिसत आहे.