मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये आजच्या 59 व्या सामन्यात पाच वेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सनं (MI) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जला 16 षटकांत सर्व गड्यांच्या मोबदल्यात 97 धावाच करता आल्या. प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने 14.5 षटकांत 5 बाद 103 धावा करून सामना जिंकला. दरम्यान, हम डूबेंगे लेकिन तुमको भी ले डूबेंगे, याचा प्रत्येय या सामन्यात आला. मुंबई इंडियन्ससह चेन्नई सुपर किंग्सचा संघ देखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. मुंबईने चेन्नईवर पाच विकेट्सने मात केली. मुंबईकडून टिळक वर्मानं 34 धावा केल्या. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवातही चांगली झाली नाही. पॉवरप्लेमध्ये संघाने 4 गडी गमावले होते. इशान किशन 6, रोहित 18 धावा करून बाद झाला. सॅम्स 1 धावा, हृतिक 18 धावा आणि डेव्हिड 17 धावा. तर दुसरीकडे चेन्नईकडून धोनीन सर्वाधिक 36 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सॅम्सने तीन, मेरेडिथ आणि कार्तिकेयने प्रत्येकी दोन गडी बाद केले. चेन्नईचे फलंदाज डेव्हॉन कॉनवे आणि मोईन अली खाते न उघडता बाद झाले. उथप्पाने 1, ऋतुराजने 7 आणि रायुडूने 10 धावा केल्या. शिवम दुबेही 10 धावा करून बाद झाला. ड्वेन ब्राव्होने 12 धावा केल्या आणि सिमरजीत दोन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
Daniel Sams set the ball rolling for @mipaltan & bagged the Player of the Match award for his fine bowling display. ??
हे सुद्धा वाचाScorecard ▶️ https://t.co/c5Cs6DHILi #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/nv72G9Sugd
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
#MumbaiIndians register their third win of the season!
The Rohit Sharma -led unit beat #CSK by 5 wickets to bag two more points. ? ?
Scorecard ▶️ https://t.co/c5Cs6DHILi #TATAIPL #CSKvMI pic.twitter.com/gqV7iL5f4I
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
धोनी आणि ड्वेन ब्राव्हो या फलंदाजांची शेवटची जोडी मैदानावर होती. गोलंदाजी करण्यासाठी कुमार कार्तिकेय आला. त्याच्या स्पिन गोलंदाजीवर ब्राव्होने पाहिल्या चेंडूवर षटकार मारला. त्यामुळे हे षटक खूप धावांसाठी जाणार, असा अंदाज सीएसकेला यावेळी आला. पण दुसऱ्याच चेंडूत फुलटॉस खेळताना ब्राव्होने चेंडू मारला आणि तिलक वर्माने अगदी जवळ उभं राहून त्याचा झेल पकडला. ही झेल तिलकनं सुपरमॅन सारखी उडी मारून पकडली.
हवेत उडी घेत टिपला भन्नाट झेल, VIDEO पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Mukesh Choudhary is our Top Performer from the second innings for his bowling figures of 3/23.
A look at his bowling summary here ?? #TATAIPL #CSKvMI pic.twitter.com/StDWPGHLeK
— IndianPremierLeague (@IPL) May 12, 2022
चेन्नईकडून धोनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आजच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात आयपीएलच्या प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्याची शेवटची संधी असेल. चेन्नईचे 11 सामन्यांत चार विजय मिळवून आठ गुण झाले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे, मुंबईपेक्षा एक स्थान वर आहे.