आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची स्थिती एकदम वाईट झाली आहे. स्पर्धेत सलग तीन सामन्यांना मुकावं लागलं आहे. 2008 नंतर मुंबई इंडियन्सच्या वाटेला असा पराभव आला आहे. त्यामुळे प्लेऑफचं गणित आणखी किचकट होणार आहे.मुंबई इंडियन्सला पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने, दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आणि तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पराभूत केलं आहे. त्यात हैदराबाद आणि राजस्थानकडून मिळालेल्या पराभवाने रनरेट विस्कळीत झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला पुढे नुसता विजय नाही तर रनरेटवरही काम करावं लागणार आहे. कर्णधार हार्दिक पांड्यानेही ट्वीट करत आम्ही लढा देऊ असं सांगितलं आहे. तर मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने हार्दिक पांड्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला फ्रेंचायसीने इमोशनल म्युझिक लावली आहे. तसेच पोस्ट लिहित हार्दिक पांड्याला टॅग गेलं आहे.
आपण का पडतो? कारण आपल्याला त्यातून शिकून वर येता येईल, अशी सांत्वन करणारी पोस्ट लिहिली आहे. या व्हिडीओत हार्दिक पांड्या एकदम इमोशनल दिसत आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्यानेही ट्वीट केलं आहे. “एक गोष्ट अशी आहे की, तुम्हाला या टीमबाबत माहिती असणं गरजेचं आहे. ती म्हणजे आम्ही कधी हार पत्कारत नाहीत. आम्ही लढत राहू आणि पुढे जात राहू.”
𝐖𝐡𝐲 𝐝𝐨 𝐰𝐞 𝐟𝐚𝐥𝐥? 𝐒𝐨 𝐭𝐡𝐚𝐭 𝐰𝐞 𝐜𝐚𝐧 𝐥𝐞𝐚𝐫𝐧 𝐭𝐨 𝐩𝐢𝐜𝐤 𝐨𝐮𝐫𝐬𝐞𝐥𝐯𝐞𝐬 𝐮𝐩. 💙#MumbaiMeriJaan #MumbaiIndians | @hardikpandya7 pic.twitter.com/k3YSlofEdV
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2024
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.दुसरीकडे, या सामन्यापूर्वी मुंबईचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव फिट होतो की नाही हा देखील प्रश्न आहे. मधल्या फळीत मुंबई इंडियन्सला वेगाने धावा करून देणारा फलंदाज नाही. त्यामुळे मुंबईची स्थिती मागच्या तीन सामन्यात नाजूक झाली होती. आता त्याच्याबाबत एनसीए काय रिपोर्ट देत याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे.
मुंबई इंडियन्स संघ: रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, शम्स मुलानी, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, क्वेना माफाका, मोहम्मद नबी, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, ल्यूक वुड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, देवाल्ड ब्रेविस