हार्दिक पांड्याच्या हट्टापुढे मुंबई इंडियन्सला झुकावं लागलं! ‘त्या’ डिलमुळे फ्रेंचायसीला घ्यावा लागला कठोर निर्णय

| Updated on: Dec 16, 2023 | 4:19 PM

आयपीएल 2024 मिनी लिलावापूर्वी मुंबई इंडियन्स संघात उलथापालथ सुरु झाली आहे. रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर सारत हार्दिक पांड्याला जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. आता या मागच्या घडामोडी हळूहळू स्पष्ट होत आहेत. त्यामुळे हे प्रकरण शिजण्यासाठी बराच कालावधी गेल्याचं दिसत आहे.

हार्दिक पांड्याच्या हट्टापुढे मुंबई इंडियन्सला झुकावं लागलं! त्या डिलमुळे फ्रेंचायसीला घ्यावा लागला कठोर निर्णय
हार्दिक पांड्याने ठेवलेल्या अटीमुळे मुंबई इंडियन्सचा निर्णय! नेमकी काय होती डील जाणून घ्या
Follow us on

मुंबई : आयपीएलच्या 17 व्या पर्वात मुंबई इंडियन्स नेतृत्व हार्दिक पांड्याच्या हाती सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात संघात खेळताना दिसणार आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून मुंबई इंडियन्सने हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. मुंबई इंडियन्ससाठी दिलेल्या योगदानाबद्दल फ्रेंचायसीने रोहितचे आभार मानले आहेत. पण हे सर्व काल परवा घडलं असं नाही. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत होत्या. मग जसप्रीत बुमराहची पोस्ट असो की आणखी काही वावड्या..आता त्या बातम्यांना खऱ्या अर्थाने भक्कमपणा मिळत आहे. आयपीएल 2024 स्पर्धेच्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेतलं. यासाठी मोठी रक्कम मोजली गेली. गुजरात टायटन्सचं कर्णधारपद असताना हार्दिक पांड्याला सहजासहजी घेणं काही शक्य नव्हतं. यामागे नक्कीच काही तरी गेम प्लान असावा असा वास क्रीडाप्रेमींना आला होता. पण हार्दिक पांड्याने कर्णधारपद देणार असाल तरच मी येईल, अशी अट ठेवल्याची बातमी आता समोर आली आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सच्या मालकाला याबाबतची पूर्ण कल्पना दिली होती. संघात परत येईल पण कर्णधारपद देणार असाल तर ते शक्य असल्याचं सांगितलं होतं. खूप विचार केल्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिकचं म्हणणं ऐकलं आणि डील पक्की केली. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरु असताना याबाबतची कल्पना रोहित शर्माला दिली होती. रोहित शर्मानेही याबाबतचा निर्णय फ्रेंचायसीवर सोडला आणि मुंबई इंडियन्स त्याला कर्णधारपदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 स्पर्धेत खेळणार आहे. अर्थात रोहित शर्माकडे आता मुंबईचं नेतृत्व नसेल. पण हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई संघात खेळताना दिसणार आहे. संघाला त्याचा अनुभवाचा नक्कीच फायदा होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाच जेतेपदावर नाव कोरलं आहे.

रोहित शर्मा आतापर्यंत 243 आयपीएल सामने खेळला. त्यात 238 सामन्यात खेळला. यात त्याने 1 शतक आमि 42 अर्धकांच्या जोरावर 6211 धावा केल्या. यात त्याचा 109 ही सर्वोत्तम खेळी होती. तर गोलंदाजी करताना त्याने 15 गडी बाद केले आहेत.