केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं. त्यानंतर 8 दिवसांनी अखेर आयपीएलच्या 17 व्या मोसमातील उर्वरित सामन्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयने सार्वत्रिक निवडणुकांमुळे 22 फेब्रुवारी रोजी आयपीएलच्या 17 व्या हंगामातील पहिल्या 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्यामध्ये एकूण 21 सामन्यांचा समावेश होता. त्यानंतर आता संपूर्ण वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे.
यंदाच्या 17 व्या मोसमातील सर्व सामने भारतात पार पडणार आहेत. प्लेऑफ सामन्यांचा मान हा अहबमदाबाद आणि चेन्नईला मिळाला आहे. बीसीसीआय पंरपरेनुसार गतविजेत्या संघाच्या शहरात सलामी आणि अंतिम सामन्याचं आयोजन करतं. त्यानुसार यंदाही ही परंपरा कायम राखली आहे. चेन्नई आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तरित्या यशस्वी टीम आहे. चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे. या हंगामात मुंबई आणि चेन्नईतील यांच्यात एकदाच सामना होणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचं संपूर्ण वेळापत्रक आपण जाणून घेऊयात.
मुंबई नेहमीप्रमाणे यंदाही 14 सामने खेळणार आहे. मुंबईने त्यापैकी आपला पहिला सामना हा 24 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळलाय. मुंबईची पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे आपण उर्वरित 13 सामन्यांबाबत जाणून घेऊयात. मुंबई आता 13 पैकी 7 सामने हे आपल्या घरच्या मैदानात अर्थात वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. तर 6 सामने हे प्रतिस्पर्धी संघाच्या होम ग्राउंडवर खेळणार आहे.
🚨 ATTENTION PALTAN 🚨
Here is 𝘈𝘈𝘗𝘓𝘐 𝘔𝘜𝘔𝘉𝘈𝘐’𝘴 complete fixture list! 💙
Which @mipaltan fixture are you most excited for? 👀
Tune-in to #SRHvMI in #IPLOnStar
WED | 6:30 PM | Only on Star Sports pic.twitter.com/necJIZoje5— Star Sports (@StarSportsIndia) March 25, 2024
मुंबईचा या हंगामात हैदराबाद, राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि कोलकाता या 5 संघांविरुद्ध 2 वेळा आमनासामना होणार आहे. तर बंगळुरु, चेन्नई आणि पंजाब यांच्यासह फक्त एकदाच सामना असणार आहे.
दरम्यान या हंगामातील पहिली फेरी 24 मार्च रोजी पूर्ण झाली आहे. एकूण 10 संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे. त्यामध्ये चेन्नई, पंजाब, कोलकाता, राजस्थान आणि गुजरात या 5 संघांनी विजयी सुरुवात केली आहे. तर बंगळुरु, दिल्ली, हैदराबाद, लखनऊ आणि मुंबई या संघांची पराभवाने सुरुवात झाली आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हार्दिक पांड्या (कर्णधार), रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, मोहम्मद नबी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, ल्यूक वुड, सूर्यकुमार यादव, श्रेयस गोपाल, विष्णू विनोद, शम्स मुलानी, रोमारियो शेफर्ड, अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, शिवालिक शर्मा, अंशुल कंबोज, आकाश मधवाल, नुवान तुषारा, डेवाल्ड ब्रेविस, क्वेना मफाका आणि नमन धीर.