मुंबई इंडियन्स ही आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रेंचायझी आहे. पण 2020 पासून आतापर्यंत जेतेपदापासून दूर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्स 4 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा जेतेपद मिळवण्यासाठी सज्ज आहे. पण असं सर्व असताना मुंबई इंडियन्सला धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही फिट नसल्याची माहिती मिळत आहे. अजूनपर्यंत पाठीदुखीच्या त्रासातून बरा झालेला नाही. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, जसप्रीत बुमराह एप्रिल महिन्याच्या सुरुवातील टीमसोबत येईल असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सुरुवातीचे तीन सामने खेळण्याची शक्यता कमी आहे. जसप्रीत बुमराह खेळणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे त्याचं संघात कमबॅक होईल की नाही याबाबतही दुसरी चर्चा आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात बुमराहला दुखापत झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याच्याबाबत ठोस असा निर्णय आलेला नाही.
टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेसवर बीसीसीआयची पूर्ण नजर आहे. कारण आयपीएलनंतर टीम इंडिया पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्शिप 2027 च्या दृष्टीने हा दौरा खूपच महत्त्वाचा आहे. त्यामुळे बीसीसीआय टीम मॅनेजमेंट आणि मेडिकल टीम बुमराहबाबत घाईगडबडीत कोणताही निर्णय घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सला आता नॅशनल क्रिकेट अकादमीच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. कारण जिथपर्यंत एनसीएकडून हिरवा कंदील मिळत नाही तोपर्यंत बुमराह स्पर्धेत खेळणं कठीण आहे.
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत बुमराहशिवाय उतरली होती. पण त्याची उणीव कुठे भासली नाही. भारताने एकही सामना न गमावता जेतेपदावर नाव कोरलं. पण मुंबई इंडियन्सला बुमराहची खूपच गरज आहे. त्याच्याशिवाय गोलंदाजीची धार बोथड होणार आहे. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जशी 23 मार्चला चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. 29 मार्चला गुजरात टायटन्सशी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये, तर तिसरा सामना गतविजेत्या कोलकात्याशाी 31 मार्चला होणार आहे