IPL 2024 : मुंबई इंडियन्सला धक्का, दोन सामन्यांसाठी हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली

| Updated on: Mar 12, 2024 | 2:14 PM

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक असताना मुंबई इंडियन्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. पण या सामन्यापूर्वी हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे. पहिल्या दोन सामन्यात दिग्गज खेळाडू मुकण्याची शक्यता आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला धक्का, दोन सामन्यांसाठी हार्दिक पांड्याची डोकेदुखी वाढली
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या गोटात खळबळ, पहिल्या दोन सामन्याच्या रणनितीवर पडणार प्रभाव
Follow us on

मुंबई : आयपीएल स्पर्धेत जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स फ्रेंचायसीने सर्वोतोपरी प्रयत्न केले आहेत. मागच्या दोन पर्वात मुंबई इंडियन्स जेतेपद मिळवू शकली नाही. त्यानंतर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाने संघात बरीच उलथापालथ केली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्माचं कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याच्या हाती सोपवलं आहे. पण आता हार्दिक पांड्याचं टेन्शन वाढलं आहे. बाद फेरीत स्थान मिळवण्यासाठी साखळी फेरीतील प्रत्येक विजय महत्त्वाचा ठरतो. असं असताना पहिल्य दोन सामन्यात दोन दिग्गज खेळाडू मुकण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. सूर्यकुमार यादव शस्त्रक्रियेनतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिकव्हर होत आहे. पण पहिल्या दोन सामन्यात खेळण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यालाही पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मैदानात उतरला नव्हता. त्याच्या फिटनेसबाबत अजूनही काही अपडेट नाहीत.

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना गुजरात टायटन्सशी 24 मार्चला होणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, ‘सूर्यकुमार यादव रिकव्हर होत आहे. तो निश्चितपणे आयपीएलमध्ये खेळणार आहे. एनसीए त्याला पहिल्या दोन सामन्यात खेळायची परवानगी देईल की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. 24 तारखेला गुजरात टायटन्स आणि 27 तारखेला सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामना आहे.’

सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात त्याने फलंदाजीचा एकही व्हिडीओ शेअर केलेला नाही. सूत्रांनी सांगितलं की, ‘मुंबई इंडियन्सच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी अजूनही 12 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण त्याच्याकडे फिट होण्यासाठी खूपच कमी वेळ आहे.’

मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 पूर्ण संघ: रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश चावला, आकाश जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, हार्दिक पांड्या (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.