मुंबई : आयपीएलच्या (IPL) पंधराव्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पाच सामने खेळून देखील एकाही सामन्यात विजयी होऊ शकलेला नाही. या मुंबई इंडियन्सच्या (MI) आयपीएलमधील खालच्या दिशेला चाललेल्या प्रवासाकडे अनेक क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ चिंता व्यक्त करतायेत. यावरुन संघातील काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीवरही बोललं जातंय. या संघाने आतापर्यंत तब्बल पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलंय. अशी भरगच्च कामगिरी अजून दुसऱ्या कुठल्याही संघाला करता आलेली नाही. पण यंदाच्या सीजनमधला मुंबईचा खेळ पाहिला की, हाच तो संघ का? असा प्रश्न पडतो. एकापाठोपाठ एक मुंबई इंडियन्सला पाच पराभवांना सामोर जावं लागलं आहे. मुंबईच्या या सुमार कामगिरीवर दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ (Graeme Smith) याने देखील चिंता व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने काय म्हटलं त्यापूर्वी कालच्या म्हणजेच बुधवारी पंजाब किंग्ससोबत झालेल्या सामन्यात मुंबईने काय केलंय, त्यावर एक नजर टाकूया. पंजाबने बुधवारी मुंबई इंडियन्सला 12 धावांनी नमवलं. मुंबईला विजयासाठी 199 धावांचं टार्गेट मिळालं होतं. पण मुंबई इंडियन्सला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 186 धावाच करता आल्या. मेगा ऑक्शननंतर मुंबई इंडियन्सने नव्याने संघ बांधणी केली आहे. पण अजूनही या संघाची घडी बसलेली नाही. मुंबई इंडियन्सची टीम अजूनही चाचपडतेय. पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्सला सहाव्या सामन्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. गुणतालिकेत मुंबईचा संघ सर्वात तळाला आहे. मुंबई इंडियन्सच्या या स्थितीवर कोणाला विश्वास बसणार नाही, पण हे आजचं वास्तव आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याला वाटते की सध्याच्या आयपीएलमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना रोहित शर्मावर संघाच्या सुमार कामगिरीचा वाईट परिणाम होत शकतो, असं स्मिथ याचं म्हणनं आहे. रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद पटकावलं आहे. तर दुसरीकडे आयपीएलच्या या सीजनमध्ये त्यांना आतापर्यंतचे पाचही सामने गमवावे लागले आहे. आयपीएलसच्या सीजन पंधरामध्ये मुंबईला खाते देखील उघडता आले नाही, असं म्हणत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने चिंता व्यक्त केली आहे.
रोहित भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार बनवल्यानंतर एमआयचे नेतृत्व करत असलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये या मानसिक तणावाचा परिणाम होतो का, हे विचारात घेतलं पाहिजे. रोहीत हा फेब्रुवारीमध्ये भारताचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आला होता. मार्चमध्ये श्रीलंकेविरुद्धची मालिकी ही रोहितची पहिली नियुक्ती होती. आयपीएलच्या या सामन्यात रोहित चांगली कामगिरी करु शकला नाही. दक्षिण अफ्रिकेतील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या स्मिथला आश्चर्य वाटलं की त्याने सर्व फॉरमेटमध्ये देशाचे नेतृत्व करण्याशी काय संबंध आहे, असंही स्मिथ म्हणालाय.
रोहित हा क्रमवारीत सर्वात वरच्या स्थानावर आहे. त्याची कागमगिरी ही त्याच्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी आहे. जेव्हा तो खेळतो तेव्हा मुंबई इंडियन्स जिंकणार हे ठरलेलं असतं. पण आयपीएलच्या या सीजनमध्ये तसं होताना दिसत नाही. रोहितचा संघ आयपीएलच्या पंधराव्या सीजनमध्ये सलग पाच वेळा हरला आहे, असंही स्मित म्हणाला असून त्याने संघाविषयी चिंता व्यक्त केली आहे.
इतर बातम्या
सावधान! भारतात कोरोना वाढतोय, 1007 नव्या रुग्णांची वाढ
मुंबई विमानतळावर 3.98 किलो हेरॉईन जप्त, दक्षिण आफ्रिकन नागरिकाला अटक