मुंबई | टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. त्यानंतर उभयसंघात वनडे सीरिज होणार आहे. त्यानंतर आयपीएलच्या 16 व्या मोसमाचा श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तसेच 2023 पासून पहिल्यांदाच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वूमन्स आयपीएल खेळवण्यात येत आहे. या वूमन्स आयपीएलच्या पहिल्या हंगामातील सलामीचा सामना हा 4 मार्चला खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्स या पर्वातील आपला पहिला सामना हा गुजरात जायंट्स विरुद्ध होणार नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे.
त्याआधी मुंबई इंडियन्सने आपला कॅप्टन जाहीर केला आहे. फ्रँचायजीने टीम इंडियाच्या खेळाडूकडे मुंबईच्या कर्णधारपदाची सूत्र दिली आहेत. मुंबई इंडियन्सने पोस्टर ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीची जबाबदारी स्मृती मंधाना हीच्याकडे आहे. हरमनप्रीत टीम इंडियाचं नेतृत्वही केलंय. वूमन्स आयपीएलसाठी 13 फेब्रुवारीला ऑक्शन पार पडलं. मुंबईने हरमनप्रीत कौरसाठी 1 कोटी 80 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. हरमनची बेस प्राईज 50 लाख रुपये इतकी होती.
हरमनप्रीत कौर मुंबईची कॅप्टन
Harmanpreet Kaur, ???????, Mumbai Indians – the magic spell. ??@ImHarmanpreet | #OneFamily #MumbaiIndians #AaliRe #WPL pic.twitter.com/QP4CG5M8Tp
— Mumbai Indians (@mipaltan) March 1, 2023
बीसीसीआयकडून या पहिल्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. या मोसमातील सर्व सामन्यांचं आयोजन हे मुंबईतील बेबॉर्न आणि नवी मुंबईतील डीवीय पाटील स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पहिल्या मोसमात एकूण 5 संघ सहभागी होणार आहेत.
मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिट्ल्स अशा 5 टीम्स ट्रॉफीसाठी भिडणार आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
मुंबई इंडियन्स मेन्स टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), कॅमरुन ग्रीन, झाय रिचर्डसन, पियूष चावला, ड्वेन यानसन, शम्स मुलानी, राघव गोयल, विष्णु विनोद, नेहल वढेरा, टीम डेविड, रमनदीप सिंह, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अरशद खान, कुमार कार्तिकेय, ऋतिक शौकीन, बेहरनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, जोफ्रा आर्चर आणि जसप्रीत बुमराह.