Mumbai Indians, Rohit Sharma : मन लावून प्रयत्न करतो, तरीही अपयश येतंय, पराभवाच्या षटकारानंतर रोहित शर्मा भावूक

| Updated on: Apr 17, 2022 | 3:55 PM

कालच्या सामन्यात सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या. मात्मुंर, मुंबई इंडियन्सला टार्गेट पूर्ण करता आलं नाही. यावर बोलताना रोहित शर्माने खूप भावूक प्रतिक्रिया दिली आहे.

Mumbai Indians, Rohit Sharma : मन लावून प्रयत्न करतो, तरीही अपयश येतंय, पराभवाच्या षटकारानंतर रोहित शर्मा भावूक
रोहित शर्मा, कर्णधार, मुंबई इंडियन्स
Image Credit source: social
Follow us on
मुंबई :  शनिवारी आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमधील मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौच्या (LSG) सामन्यात मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागलाय. यावेळी इंडियन्सकडून पराभवाचा षटकार गेला.  तर दुसरीकडे लखनौ 18 धावांनी विजयी झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात सूर्यकुमार यादव याने 27 बॉलमध्ये 37 धावा काढल्या. त्यामध्ये त्याने तीन चौकार मारले. त्यानंतर सर्वाधिक धावा काढणारा. ब्रेव्हिस होता. त्याने तेरा बॉलमध्ये 31 धावा काढल्या. त्यामध्ये सहा चौकार आणि एक षटकार त्याने मारला. त्यानंतर वर्मान 26 धावा काढल्या. त्यापैकी दोन चौकार त्याने मारले. त्यानंतर पंचवीस धावा चौदा बॉलमध्ये पोलार्डने काढल्या. किशनने तेरा, उनाडकटने चौदा, शर्मा रोहितने सहा धावा काढल्या. यामुळे मुंबई इंडियन्सला 181 धावांपर्यंतच पोहचता आलं आणि लखनौचा 18 धावांनी विजय झाला. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा सहाव्या पराभवानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) भावूक झाला.

रोहित काय म्हणाला?

मुंबई इंडियन्स (MI) आणि लखनौच्या (LSG) सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने म्हणाला की,  ‘संघाच्या पराभवाची, संघा आहे त्या स्थितीची पूर्ण जबाबदारी मी घेतो. खेळाला एका चांगल्या परीस्थित घेऊन जाण्यास मी नेहमी उत्सुक आहे. पण मी मन लावून खूप प्रयत्न करून देखील तिथंपर्यंत संघाला घेऊन जाण्यास अपयशी ठरतोय. त्यात मला यश मिळत नाहीये. त्याचे मला खूप दुःख आहे.

सामन्यात काय झालं?

मुंबई इंडियन्सने शनिवारी सुरुवातीला लखनौला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलं. त्यानंतर लखनौच्या संघाने जोरदार फलंदाजी करायला सुरवात केली. यावेळी 60 बॉलमधे सर्वाधिक 103 धावा केएल राहुलने काढल्या. यामध्ये त्याने तब्बल 9 चौकार आणि 5 षटकार मारले. विशेष म्हणजे राहुलने सामन्यात आयपीएलमधलं तिसरं शतक पूर्ण केलंय. राहुलनंतर सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला मनीष पांडे. याने 29 बॉलमध्ये 38 धावा काढल्या. यापैकी सहा चैकार मनीष पांडेनं मारले. यानंतर डी कॉकने 24 धावा तेरा बॉलमध्ये काढल्या. यात एक षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे. दीपक हुड्डाने 8 बॉलमध्ये 15 धावा काढल्या. यामध्ये दीपकने एक चौकार आणि एक षटकार मारला. तर स्टॉईनसने नऊ बॉलमध्ये दहा धावा काढल्या. त्यात त्याने एक षटकार मारला आहे. क्रुणाल पंड्याने एक बॉलमध्ये एक रन काढला. अशा प्रकारे लखनौ सुपर जायंट्सने 20 ओवरमध्ये 199 धावा काढल्या असून लखनौने मुंबई इंडियन्सला 200 धावांचं टार्गेट दिलं होतं. पण, ते मुंबई इंडियन्सला पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे 18 धावांनी लखनौचा विजय झाला आणि मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा आली.
इतर बातम्या
बाळाचं नाव सुचवा अन् सात लाख रूपये मिळवा, ‘बेबी नेमर’सारखी सुखाची नोकरी नाही!
Chhagan Bhujbal : भक्तीचे नव्हे, हे शक्तीचे राजकारण, भुजबळांचा आसूड; नाशिकमध्ये धारीवाल हॉस्पिटल-रिसर्च सेंटरचे उदघाटन
Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!