मुंबई : वुमन्स प्रीमिअर लीग 2024 मधील मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्समधील सामन्यात महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याच्या किरन नवगिरे हिने विक्रमी अर्धशतकी खेळी केली आहे. मुंबईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना ओपनिंगला आलेल्या किरनने मुंबईच्या गोलंदाजांचा धुरळा उडवला. अवघ्या 25 चेंडूत तिने अर्धशतक ठोकत वुमन्स प्रीमिअर लीगमधील यंदाच सर्वात वेगवान अर्धशतक करण्याच्या विक्रम आपल्या नावावर केला आहे. वुमन्स प्रीमिअर लीगमधील सर्वात वेगवान पाच नंबरची अर्धशतकी खेळी ठरली आहे.
वेगवान अर्धशतकाचा विक्रम सोफिया डंकली हिच्या नावावर आहे. सोफियाने 18 चेंडूत आरसीबीविरूद्ध अर्धशतक ठोकलं होतं. दुसऱ्या स्थानी शफाली वर्मा असून तिने 19 चेंडूत गुजराविरूद्ध, तिसऱ्या स्थानी सोफी डिवाइन हिने 20 चेंडूत तर चौथ्या स्थानी हरमनप्रीत कौर असून तिने 22 चेंडूत अर्धशतक केलं होतं.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 161-6 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठालाग करण्यासाठी उतरलेल्या युपी वॉरियर्सची ओपनर किरन हिने तुफानी हल्ला केला. फक्त 31 चेंडूमध्ये तिने 57 धावांची खेळी आहे. यामध्ये सहा चौकार आणि चार षटकार मारले. मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा तिने घाम काढला.
मुंबईकडून हेली मॅथ्यूज हिने सर्वाधिक 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. यामध्ये तिने 9 चौकार आणि 1 षटकार मारला. इतर कोणत्याही खेळाडूला तीसपेक्षा जास्त धावसंख्या गाठता आली नाही. यास्तिका भाटिया हिने सुरूवातीला आक्रमक 26 धावांची खेळी करत मुंबईला सुरूवात करून दिली होती. तर ग्रेस हॅरिस, अंजली सर्वानी, सोफी एक्सलस्टोन, दीप्ती शर्मा आणि राजेश्वरी गायकवाड यांनी 1 विकेचट घेतली.
Back to back SIXES from Navgire as she brings up her FIFTY off just 25 deliveries.
A solid knock this! 🔥💥👏
Live – https://t.co/B5aPe30OXX #TATAWPL #MIvUPW pic.twitter.com/ZxgVK6IR5h
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 28, 2024
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): यास्तिका भाटिया (W), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट (C), अमेलिया केर, पूजा वस्त्राकर, अमनजोत कौर, इस्सी वाँग, एस सजना, हुमैरा काझी, कीर्थना बालकृष्णन, सायका इशाक
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (W/C), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, अंजली सरवाणी, राजेश्वरी गायकवाड