मुंबई | टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर आणि मुंबईकर शार्दुल ठाकुर याने रणजी ट्रॉफीत स्पर्धेत धमाका केला आहे. शार्दुल ठाकुरने मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीत मुंबई विरुद्ध आसाम सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. शार्दुलने आसामच्या बॅटिंगला सुरुंग लावला. शार्दुलने आसामला 6 झटके देत बाजार उठवला. शार्दुलने अवघ्या 21 धावांच्या मोबदल्यात 6 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शार्दुलच्या या दणक्यामुळे आसामचा पहिला डाव हा अवघ्या 84 धावांवर आटोपला.
शार्दुल ठाकुरने परवेज मुसरफ, सुमीत घाडीगावकर, कॅप्टन देनिश दास, कुणाला सर्मा, सुनिल लचित आणि दिबकर जोहरी या 6 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. शार्दुलने या 6 विकेट्सच्या मदतीने फर्स्ट क्लास क्रिकेमध्ये 250 विकेट्सच्या टप्पा पार केला. शार्दुलने 79 डावांमध्ये ही कामगिरी केली. तसेच शार्दुलची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याची ही 14 वी वेळ ठरली.
दरम्यान मुंबईने आसामला 84 धावांवर रोखल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 6 विकेट्स गमावून 48.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स 217 धावा केल्या. मुंबईकडून शिवम दुबे याने नाबाद सर्वाधिक 101 धावा केल्या. तर शार्दुल ठाकुर 2 धावांवर नॉट आऊट परतला. कॅप्टन अजिंक्य रहाणे आणि हार्दिक तामोरे या दोघांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओपनर पृथ्वी शॉ याने 30 धावांचं योगदान दिलं. तर भुपेन ललवाणी आणि सूर्यांश शेंडगे या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. आसामकडून दिबाकर जोहरी आणि राहुल सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर कुणाल सर्मा आणि सुनील लचित या दोघांना 1-1 विकेट मिळाली.
शार्दुल ठाकुरचा विकेट्सचा सिक्स
Shardul Special 🔥
10.1-0-21-6⃣@imShard bowled a fabulous spell of 6⃣/2⃣1⃣ to help Mumbai bowl Assam out for 84 in the first innings in Mumbai.
Relive his brilliant spell 🔽@IDFCFIRSTBank | #RanjiTrophy pic.twitter.com/Qwrxs2kYkH
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 16, 2024
मुंबई प्लेईंग ईलेव्हन | अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, भूपेन लालवाणी, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी आणि तुषार देशपांडे.
आसाम प्लेईंग ईलेव्हन | परवेज मुसरफ, राहुल हजारिका, अब्दुल अजीज कुरैशी, राहुल सिंग, डेनिश दास (कॅप्टन), दिबाकर जोहरी, सुनील लचित, सुमित घाडीगावकर (विकेटकीपर), कुणाल सरमा, अभिषेक ठाकुरी आणि साहिल जैन.